pensioner again getting chances in job, youngster still waiting 
नागपूर

युवकांना ठेंगा, पेन्शनधाकांनाच पुन्हा नोकरीत संधी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्याने रोजगार देण्याची भाषा विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विरोधात असताना होती. सत्तेत आल्यावर भाषेचा सूर बदला असून जुन्या सरकारप्रमाणेच सेवानिवृत्तीधारकांना सेवेत संधी देण्याच्या तयारीत सरकार आहे. यामुळे राज्यातील बेरोजगारी दूर होणार कशी, असाच सवाल उपस्थित होत आहे. 

राज्यात जवळपास सर्वच शासकीय विभागात पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची संख्या लाखोंच्या घरात आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले. बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्य सरकारने भरतीवर निर्बंध घातले आहे.

परंतु, दुसरीकडे पेन्शनधारी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेत. अनुभवाचे कारण पुढे करून यांना सेवेत घेण्यात येणार आहे. यांना पेन्शनची रक्‍कम लागलीच देण्याची वेळ येणार नसल्याचे आर्थिक ताण येणार नसल्याचेही कारण सरकारी पातळीवर देण्यात येत असल्याचे समजते. यापूर्वीच्या सरकारनेही अशाच प्रकारे अधिकाऱ्यांची सेवा घेतली होती.

पेन्शन असतानाही त्यांना 30 ते 50 हजार रुपये मानधनावर सेवेत घेण्यात आले होते. त्यावेळी विरोधात असताना राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. विशेष म्हणजे मर्जीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

जुने अधिकारी, कर्मचारी टेक्‍नासॅव्ही नाहीत. त्यांना सेवेत घेतल्यास कामाला गती येणार नाही. हे धोरण सरकारसाठी आर्थिक नुकसानीचे ठरेल. 
-राहित घोंगडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन 

सरकारचे धोरण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बेरोजगारांना संधी मिळणार नाही. रोजगार मिळणार नाही. देश आणि राज्यासाठी घातक निर्णय ठरणार आहे. 
-भूषण वाघमारे, अध्यक्ष, बासा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT