social distance 
नागपूर

आले जनतेच्या मना...मास्क घालायला सांगणा-या आरोग्य अधिकाऱ्याचीच धुलाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पोलिस आणि आरोग्य अधिकारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. मात्क कधीकधी त्यांना जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागते. अशीच घटना नुकतीच घडली.
 सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे व शारीरिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
रिना पुरुषोत्तम तिवारी (38) रा. महात्मा गांधीनगर, सेमिनरी हिल्स, विनोद डमरकुमार शाही (42) आणि राजेश डमरकुमार शाही (37) रा. महात्मा गांधीनगर, सुरेंद्रगढ अशी आरोपींची नावे असून विनोद व राजेश यांना अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा - बियाणे खरेदी करताय सावधान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिना तिवारी या कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्य आहेत. संजय रुपलाल करीहार (47) रा. बोरकरनगर, घाटरोड हे आरोग्य अधिकारी असून आहेत. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीनुसार, रिना तिवारी या आपल्या दोन मुलांसह रस्त्याने जात होत्या. परंतु तोंडावर मास्क बांधला नव्हता. संजय यांनी स्वत:चा परिचय देऊन त्यांना तोंडावर मास्क बांधणे व शारीरिक अंतर राखण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी अरेरावी केली. आपण प्राचार्य असल्याचे सांगितले. यावेळी कारवाईकरिता आरोग्य अधिकारी त्यांचा पुरावा म्हणून छायाचित्र काढत असताना रिना यांनी त्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाऊ विनोद व राजेश यांना फोन करून बोलवून घेतले. यावेळी आरोपींनी संगनमताने संजय यांच्याशी भांडून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी संजय करीहार यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT