file 
नागपूर

. काटोलवासी धास्तावले, काय कारण आहे त्यांच्या भीतीचे.

सकाळ वृत्तसेवा


काटोल (जि.नागपूर) : शहर व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या सतत वाढतीवर असून आज सोमवारी परत काटोल येथे 2 व झिलपा एक असे तीन रुग्ण आढळले,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशांक व्यवहारे, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सुधीर वाघमारे यांनी दिली. झिलपा येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दहा 10जणांना सोमवारी रात्री हलविण्यात आले. झिलपा येथे 2 पॉझिटिव्ह तर तालुक्‍यात नव्याने डझनावर (12)रुग्ण पोहोचले आहेत.

अधिक वाचा: हीच की "शिव'सेना? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्याला दिले शहरप्रमुखपद...

रुग्णसंख्या पोहोचली14
शनिवार, विवारी काटोल शहरात कोविड- 19 चे मोठ्या प्रमाणात रुग्ण निघाले होते. त्यात नजीकच्या झिलपा व पानवाडी या गावातून प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याने काटोल शहरासोबत ग्रामीण परिसरसुद्धा हादरला होता. ही शृंखला कायम ठेवत रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचा इशारा आपत्ती निवारण समितीने दिला असून नागरिकांनी पावसाळयात काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारपासून तीन दिवस काटोल बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

काटोल तीन दिवस बंद
शहरात एकाच दिवशी आठ रुग्ण मिळाल्याने तसेच रग्ण सातत्याने वाढत असल्याने आकडा डझनावर गेला आहे. यापूर्वी रिधोरा "कनेक्‍शन' मधील तीन रुग्ण काटोल राऊतपुरा येथील आढळून आले होते. त्यानंतर आता तीन हप्त्यानंतर आंध्र "कनेक्‍शन'मधून अकरा रुग्ण संख्या वाढल्याने काटोल बाजारपेठ, सोमवार, मंगळवार, बुधवारला पूर्णपणे तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन काटोल व्यापारी संघ व व्यापारी कल्याणकारी संघांनी जाहीर केले आहे. तरी आज तीन रुग्ण वाढले असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

स्वच्छता हीच रामबाण लस
शहरात व ग्रामीण भागात पावसाळ्यात सतत रुग्ण वाढत आहेत. जनता कर्फ्यू चार दिवस राहील, पण कोरोना संसर्ग कमी होणार नाही. याकरिता घरीच राहणे, बाहेर पडताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हीच रामबाण लस आहे.
डॉ.सुधीर वाघमारे
ग्रामीण रुग्णालय काटोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT