river e sakal
नागपूर

तीन तास पुरात अडकूनही 'तो' होता निश्चिंत; ३ तासांनंतर सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि. नागपूर) : दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे वेणा नदीला पूर (wena river flood) आला. नदीच्या मधोमध श्री राधाकृष्ण मंदिर आहे. या मंदिरात एक वेडसर इसम झोपला होता. मंदिराच्या सभोवताली पुराचे पाणी झाल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. पोलिसांनी एसआरडीएफ (SDRF) पथकाला पाचारण केले. बुधवारी दुपारी तीन वाजतापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे थरारनाट्य चालले. या बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने इसमाला पुराच्या वेढ्यातून बाहेर सुखरूप बाहेर काढले. तसेच पुराच्या पाण्याचा वेढा वाढल्याने खैरी पन्नासे या गावाचा संपर्क देखील तुटला आहे.(people stranded in flood of wena river are not safe in hingna of nagpur)

रायपूरनिवासी मुन्ना गुलाब बानिया (५०) हा मानसिक रुग्ण आहे. नेहमीप्रमाणे घरून दुपारी बारा वाजता जेवण केल्यानंतर हा विश्राम करण्याच्या हेतूने वेणा नदीपात्रातील राधाकृष्ण मंदिरात गेला. या ठिकाणी तो निवांत झोपला. दुपारी दोन वाजतापासून पावसाला दमदार सुरुवात झाली. पाहता-पाहता दोन तासातच वेणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले. राधाकृष्ण मंदिर वेणा नदीच्या पात्रात मधोमध असल्याने या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. जवळपास मंदिराच्या छतापर्यंत पाणी पोहोचले होते. मंदिराच्या छतावर एक महाराजांची मूर्ती असून या ठिकाणी छोटासा कळस करून मंदिर तयार केले आहे. पुराचे पाणी वाढल्यानंतर वेडसर इसमाला जाग आली. नदीच्या तिरावर असलेल्या काही ग्रामस्थांनी त्याला वर जाण्याची सूचना केली. तो मंदिराच्या छतावरील एका छोट्याशा कळस असलेल्या मंदिरात जाऊन बसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सारींन दुर्गे, पोलिस निरीक्षक सपना क्षिरसागर, तहसीलदार संतोष खांडरे, ग्रामसेवक वाभीटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शेवटी मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, सुजित जंबेली यांच्या नेतृत्वात २३ जवानांचे पथक दाखल झाले. यानंतर मोटरबोटीच्या सहाय्याने जवान नदीपात्रात शिरले. राधाकृष्ण मंदिराच्या छताजवळ बोट नेली. यानंतर वेडसर इसमाला छतावरून सुखरूप बाहेर काढून बोटीत बसविले. यानंतर नदीच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. उपस्थित रायपूर ग्रामस्थांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे आभार मानले. दुपारी तीन वाजतापासून सुरू असलेले थरारनाट्य सायंकाळी सहा वाजता अखेर संपले. या ठिकाणी बचावपथकाचे कार्य पाहण्यासाठी ग्रामस्थांची जत्रा भरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT