aapli bus.jpg 
नागपूर

आता बस चालकालाही झाेडपले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील वाठोडा येथे सिम्बॉयसिसमधील विलगीकरण केंद्रातील नागरिकांनी आज विलंब केल्याच्या कारणावरून आपली बसच्या चालकाला मारहाण केली. सिम्बॉयसिस येथील विलगीकरण केंद्रात शहरातील संशयित कोरोनाबाधितांना ठेवण्यात आले आहे. यातील काहींचा विलगीकरणाचा अवधी संपुष्टात आला. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या परिसरात सोडण्यासाठी महापालिका परिवहन विभागाची आपली बसची सोय करण्यात आली आहे.

बसचालक विलंबाने पोहोचल्याने विलगीकरणातील नागरिकांचा संताप अनावर झाला. गेल्या काही दिवसांपासून जेवण आदी सुविधेवरून नागरिक संतप्त झाले होते. आज त्यांचा संयम ढासळला. त्यांनी विलंबाने का आला, असा सवाल बसचालकास केला. यावरून बसचालक व नागरिकांत वाद सुरू झाला. काही नागरिकांनी बस चालकाला मारहाण केली. त्यामुळे बस चालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. येथे वाद झाल्याचे वाठोडा पोलिसांनी नमूद केले. परंतु, याबाबत कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.

आपली बस चालकांना अद्याप वेतन नाही
आपली बसची शहरात सेवा बंद असली, तरी संशयित कोरोनाबाधितांना विलगीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी चालक जोखीम पत्करून पार पाडत आहेत. मात्र, अद्याप त्यांचे वेतन झाले नसल्याचे समजते. त्यामुळे परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी आयुक्तांना पत्र देऊन चालकांच्या वेतनाबाबत तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रवाना

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

संकल्पना सोप्या करणे ‘एआय’चे काम

SCROLL FOR NEXT