Permission to sell liquor in Nagpur district 
नागपूर

अखेर नागपूर जिल्ह्यातील तळीरामांची झाली सोय, अशी असेल मद्य विक्रीची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लॉकडाउन लागू झाला. फक्‍त जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे दारुड्यांमध्ये पार निराश पसरली. दारूची दुकाने बंद असल्याने तळीरामांना दिवस काढणे कठीण जात होते. यामुळे त्यांनी मोहफुलाच्या दारूकडे धाव घेतली होती. एक ग्लास दारूसाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र, आता मद्यपींचा गळा ओला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात दारूविक्रीस प्रारंभ होईल, असे स्पष्ट संकेत सूत्रांकडून मिळाले आहे. ऑनलाईन आणि टोकण पद्धतीने दारूची विक्री होणार असल्याचे सांगण्यात येते. 

कोरोना विषाणुमुळे पावणे दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 18 मार्चला जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. यामुळे मद्यपींची चांगलीच अडचण झाली. देशी व विदेशी दारूविक्रीवर बंदी असल्याने मद्यपींनी गावठी दारू रिचवली. लॉकडाउनच्या तिस्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने दारूविक्रीस परवानगी दिली. परंतु, नागपूर शहानगर पालिका आयुक्त तुकारा मुंढे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दारूविक्रीस परवानगी नाकारली. यामुळे मद्यपींमध्ये चांगलीच नाराजी झाली.

यामुळे अवैध दारूविक्रीचे प्रमाणही वाढले. मद्यपींनी दुकाने फोडून दारू चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाकडून दारूविक्रीसाठी काही अटी व शर्थी घालून दिल्या. त्यानंतर आता नागपूर जिल्ह्यातही दारूची दुकाने सुरू होणार आहे. महानगर पालिका आयुक्त तुकारा मुंढे यांनी आधीच मंजुरी दिली आहे. 

रात्री उशिरापर्यंच चालली बैठक

मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारला रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली. यावेळी उत्पादन शुल्क व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी दुकाने सुरू करण्यास सहमती दर्शविली. गुरुवारला ही सकाळपासून अधिकाऱ्याच्या बैठका सुरू आहेत. ऑनलाईन आणि टोकण पद्धतीनुसार याची विक्री होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशी दारू ऑनलाईन मिळणार नसल्याचे समजते. 

मुंढेंनी दिला होता नकार

तिसऱ्या लॉकडाउनमध्ये अनेक ठिकाणी दारूची दुकाने सुरू झाली होती. यात मुंबई, पुणे यांचाही समावेश होता. मात्र, महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नागपुरात दारूविक्रीस मनाई केली होती. यामुळे तळीरामांमध्ये निराशा पसरली होती. सर्व ठिकाणी दारूची दुकाने सुरू असताना मुंढे यांचा विरोध का, असाच प्रश्‍न तळीराम एकमेकांना विचारत होते. मात्र, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत विक्री

शुक्रवारपासून दारूव्रिकी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. याअंतर्गत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन व टोकण पद्धतीने दारू विक्री करण्यात येणार आहे. यामुळे दारुड्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ऑनलाईन दारूविक्रीतून देशी दारूला वगळण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT