child died child died
नागपूर

मांजरीने घेतला जीव! कीटकनाशक चाटल्याने चिमुकल्याचा मृत्यू

खेळता खेळता रियांशने जमिनीवर पडलेले विष चाटल्याने त्याची प्रकृती बिघडली

अनिल कांबळे

नागपूर : भिंतीवरील कीटकनाशकाचा डब्बा मांजरीने खाली पाडल्यानंतर घरात सांडलेले कीटकनाशक दीड वर्षाच्या चिमुकल्याने चाटले. त्यामुळे चिमुकला बेशुद्ध पडला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. रियांश ऊर्फ मुन्ना अजय पाटील (रा. समतानगर, मलका कॉलनी) असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पाटील हे शेतकरी असून, दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला. त्यांना रियांश नावाचा दीड वर्षाच एकुलता एक मुलगा आहे. अजय यांनी शेतात फवारणी करण्यासाठी कीटकनाशकाचा डबा घरात आणून ठेवला होता. घटनेच्या वेळी रियांश हा घरात खेळत होता. त्याचवेळी मांजरीने पाटीवर ठेवलेला कीटकनाशकाचा डबा पाडला. त्यामुळे जमिनीवर विष सांडले.

खेळता खेळता रियांशने जमिनीवर पडलेले विष चाटल्याने त्याची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचाराचा खर्च वारेमाप सांगितल्यामुळे आर्थिक स्थितीने खचलेल्या अजय यांनी मेयोत दाखल केले. मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT