Petrol Price Hike by Rs 5 in Nagpur 
नागपूर

बापरे! नागपुरात सात दिवसांत पाच रुपयांची पेट्रोल वाढ! 

सकाळ वृत्तसेवा

 नागपूर : टाळेबंदीमध्ये सलग 83 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर इंधन कंपन्यांनी आता ग्राहकांचा खिसा हलका करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सात दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज रविवारी शहरात पेट्रोल प्रति लिटर 83.18 रुपये तर डिझेल प्रति लिटर 71.18 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या सात दिवसांत पेट्रोल 4.89 रुपयांनी तर डिझेल सरासरी 4.03 रुपये प्रति लिटरने महागले आहे. 


कोरोनाची पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन आढावा बंद केला होता. सात जूनपासून कंपन्यांनी दररोज इंधन दर आढावा घेणे सुरू केले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारल्याने इंधनाच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. तब्बल 83 दिवसांनंतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत टाळेबंदीमुळे रस्ते वाहतूक थंडावली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या.

शनिवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर 82.59 रुपये होते, त्यात 0.59 पैशाची वाढ झाल्याने ते 83.18 रुपयांवर तर डिझेलचे दरातही प्रति लिटर 0.34 पैशाची वाढ झाल्याने ते 71.24 रुपयांवर पोहोचले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT