Petrol pump owner killed in Bhiwapur One injured three accused in custody rural police nagpur sakal
नागपूर

Nagpur Crime: १९ सेकंदात २९ वार! नागपुरात पेट्रोलपंप चालकाची दिवसाढवळ्या हत्या, पत्नीवर संशय?

एक जण जखमी; तिन्ही आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भिवापूरमधील उमरेड- नागभीड मार्गावरील ‘पाटील ब्रदर्स पेट्रोलिअम’नावाने असलेल्या पेट्रोलपंपाच्या मालकाचा तीन बुरखाधारी तरुणांनी चाकूने वार करीत, निर्घृण खून केला. यावेळी त्यांनी काऊंटरमधील एक लाख ३४ हजार रुपये लुटून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१७) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी काही तासातच तिन्ही आरोपींना अटक केली असून सुपारी देत हा खून केल्याचा कयास पोलिसांनी लावला आहे. शेख अफरोज शेख हनीफ (वय ३३, रा.मोठा ताजबाग), मोहम्मद वसीम लाल मोहम्मद (वय २९, रा.खरबी), जुबेर खान (वय २७, मोठा ताजबाग) अशी आरोपींची नाव आहेत. तर दिलीप सोनटक्के (वय ६० रा. दिघोरी) असे मृत मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास दिलीप सोनटक्के पेट्रोलपंपवर बसले असताना, तिथे शेख अफरोज, मोहम्मद वसीम, जुबेर तिघेही बुरखा घालून आलेत. त्यांनी थेट मालक सोनटक्के यांचे कार्यालय गाठून एकापाठोपाठ त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. यामुळे दिलीप सोनटक्के रक्ताच्या थारोळ्यात पडले.

त्यांना वाचविण्यासाठी पेट्रोलपंपावर असलेला कर्मचारी राजेश्‍वर नान्हे गेला असता, त्याच्यावरही वार करीत, जखमी केले. दरम्यान त्यापैकी एक आरोपीने पिस्टल काढून त्याच्या धाक दाखवीत, कॅश काऊंटरमधे असलेले एक लाख ३४ हजार घेत, तिघेही चारचाकीमध्ये बसून फरार झाले.

घटनेची माहिती भिवापूर पोलिसांना मिळताच, त्यांनी तपासाची सूत्रे हलवीत, व्हॅन उमरेडच्या दिशेने येत असल्याची सूचना उमरेड पोलिसांना दिली. पोलिसांनी नाकाबंदी करीत, चारचाकी वाहन दिसताच, त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आरोपींनी चकमा देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी शिफातीने अफरोज आणि वसीम यांना अटक केली. मात्र, जुबेर त्यात नसल्याने त्याचा शोध घेतला असता, ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.

पत्नीशी होता वाद

दिलीप सोनटक्के यांचे विवाहबाह्य काही महिलांशी संबंध होते. ही बाब त्यांच्या पत्नीला माहिती होती. त्यामुळे त्यांचे सातत्याने वाद व्हायचे अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यातून हा प्रकार घडला काय? याचाही तपास पोलिस करीत आहेत.

पंधरा मिनिटांचा थरार

दहा वाजताच्या सुमारास तिघेही पेट्रोलपंपावर आल्यावर तिघांपैकी दोघांनी दिलीप सोनटक्के यांच्या कार्यालयात शिरून त्यांच्यावर त्यांच्या पोटावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी वसीमने पिस्तुलाचा धाक दाखवीत, सर्वांनाच रोखून धरले होते. पाच ते सात मिनिटे त्यांनी वार करीत दिलीप यांना संपविले.

सुपारी किलिंगचा प्रकार?

तिन्ही आरोपींनी लुटण्याच्या प्रयत्नातून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आरोपींनी केवळ कॅश काऊंटरमधील एक लाख ३४ हजारांची रक्कम लुटून नेली. मात्र, त्यांनी दिलीप सोनटक्के यांच्या गळ्यात असलेला पाच तोळ्यांचा गोफ वा त्यांच्या हातात असलेल्या अंगठ्या चोरून नेल्या नाहीत. त्यामुळे आरोपी केवळ खुनाच्या इराद्यानेच आले असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. तसेच हा सुपारी किलिंगचा प्रकार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अटक आरोपी जुबेर खान हा ‘हिस्ट्रीशिटर’ असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT