petrol pump petrol pump
नागपूर

पेट्रोल पंपाचा पाईप पारदर्शी होणार?

पेट्रोल १२० रुपये पार : घोळ करीत असल्याचा अनेकांच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत रोज वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पंपावरून पेट्रोल, डिझेलमध्ये कंची मारली जात असल्याची शंका अनेकांना आहे. त्यामुळे पंपावरील पाईप पारदर्शी करण्याची मागणी सामान्यांची आहे.

पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली आहे. पेट्रोलने तर शतक मारल्यानंतर वेगवान गतीने रन काढत १२० चा पल्ला गाठला आहे. यामुळे नागरिकांच्या अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. पेट्रोलचा खर्च वाढल्याने गृहिणींच्या हातात येणाऱ्या रकमेवरही परिणाम झाला. परिणामी त्यांचे बजेट बिघडत आहे. शंभर रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत नाही. त्यामुळे प्रवासाचा किलोमीटरमागील खर्च वाढला. पंपावर पेट्रोल टाकताना कंची मारत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. काहींकडून त्याचे उदाहरणही देण्या आले.(Petrol News)

पंपाच्या मशीनमधून पेट्रोल, डिझेलची चोरी करण्यासाठी विशिष्ट चिपचा वापर करण्यात येत असल्याचे यापूर्वीच पोलिसांनी उघडे केले होते. काही ठिकाण कारवाई सुद्धा करण्यात आली होती. पट्रोल भरल्यावर लिटरमागे अपेक्षित अव्हरेज मिळत नसल्याचे अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे पेट्रोल भरताना चोरी होत असल्याची शंका अनेकांना असते.

पंपावर पेट्रोल भरण्यासाठी काळ्या रंगाच्या पाईपचा वापर होतो. या पाईपमधून नेमके पेट्रोल योग्यरीत्या जात आहे की नाही, हे दिसत नाही. पेट्रोलचे भाव वाढत असल्याने त्याची बचत करण्याचा काहींचा प्रयत्न असते तर काहींचा पूर्ण पेट्रोल मिळण्यासाठी आग्रह असते. पंपावर पेट्रोलवर अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची शंका दूर करण्यासाठी पंपावरील काळा पाईप काढून त्याठिकाणी पारदर्शी पाईप लावण्याचा गरज आहे.

''काळा पाईप पारदर्शक झाल्यास त्यातून खरच पेट्रोल येत आहे की नाही, हे आम्हाला पाहता येईल. पेट्रोलचे भाव वाढले आहे. ते खिशाला परवडण्या जोगे नाही. त्यामुळे ते योग्यरित्या मिळाले पाहिजे.''

-उमेश गेडाम.

''पंपवर पेट्रोल कमी भरल्यात असल्याचे शंका अनेकदा होते. परंतु काहीच करता येत नाही. त्यामुळे हा पाईप पारदर्शी करण्याची गरज आहे. सरकारने याची दखल घेतली घेतली पोहिजे.''

-अनिकेत कुत्तरमारे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT