PP 
नागपूर

पेट्रोल विक्रीलाही लॉकडाउनचे चटके; शहरात निम्म्याने घट; कामगारांचे पगारही निघणे कठीण 

राजेश रामपूरकर

नागपूर ः कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे शहरातील पेट्रोलविक्रीमध्ये तब्बल पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. व्यवहार सुरळीत असताना दररोज शहरात अंदाजे साडे पाच ते सहा लाख लिटर पेट्रोलची विक्री होती. ती विक्री आता सव्वा तीन लाख लिटरपर्यंत आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने ते टाळेबंदीतही सुरू आहेत. परंतु, या काळात नागरिकांचे दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे होत नाहीत. त्यामुळे दररोज सकाळपासून फिरू लागणारी वाहनांची चाके काही अंशी थांबलेली आहेत. गरज असेल तरच बाहेर पडण्याकडे नागरिकांचा कल आहे. 

भाजीपाला, डेली नीड्स, किराणा यासाठी नागरिक घराजवळच्या दुकानात जाण्यास पसंती देत आहेत. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजाराच्या पलिकडे आणि मृत्यूची संख्याही वाढत असल्याने भीती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम पेट्रोलविक्रीवर दिसून येत आहे. परिणामी येथे काम करणाऱ्या कामगारांचे पगारही निघणे कठीण झाले आहे.

फिरणे बंद, बाहेरगावी जाणेही बंद

अनेकांनी बाहेर फिरणेच बंद केले आहे. तसेच बाहेरगावी जाणेही टाळले आहे. त्यामुळेच इंधनाची मागणी कमी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोलपंपावरील विक्री कमी झाली आहे, अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सकाळशी बोलताना दिली.

शहरातील स्थिती

पेट्रोल पंप ः ८५
टाळेबंदी पूर्वीची दररोजची पेट्रोल विक्री ः सहा लाख लिटर
सध्याची विक्री ः सव्वा तीन लाख लिटर

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

SCROLL FOR NEXT