Ajit Pawar Esakal
नागपूर

Ajit Pawar: दादा, आमच्याबद्दल हे बोलणं बरं नव्हं! अजित पवारांच्या वक्तव्याचा पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांकडून निषेध

‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ विधान परिषदेतील या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ विधान परिषदेतील या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी निषेध केला. समाज माध्यमांवर पवार ट्रोल झाले असून, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.(Latest Marathi News)

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील, यावर मंगळवारी (ता. १२) चर्चा झाली. विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाईल. असा निर्णय सरकारने घेतला आहे. ही संख्या वाढवावी.’’ या मागणीवरून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’’ (Marathi Tajya Batmya)

पवार यांनी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यासंदर्भात जे अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्याचा राज्यातील समस्त उच्चशिक्षित विद्यार्थी तीव्र शब्दांत निषेध करत आहेत, अशी भावना संशोधक विद्यार्थी नितीन आंधळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सारथी, बार्टी, महाज्योती या संस्था फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने स्थापन झाल्या आहेत. या संस्थांची स्थापना संशोधनाला चालना देण्यासाठी झाली आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मराठा, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती समाजातील विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या फेलोशिपसाठी सरकारविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना न्याय द्यायचे सोडून अपमानजनक टिप्पणी करणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.’’(Latest Marathi News)

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला विशेष महत्त्व दिले आहे. असे असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी वादग्रस्त विधान करणे चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. सर्व संस्थांमार्फत सरसकट शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आम्ही ठाम असून राज्यभर लढा उभारत आहोत.

- राहुल ससाणे, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT