physically challenged people demands for their rights  
नागपूर

'अहो, आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे?' कोणी उपस्थित केला हा सवाल; वाचा सविस्तर   

योगेश बरवड

नागपूर : दिव्यांगांसाठीच्या योजना केवळ कागदावरच आहेत. पाच-पाच वर्षे प्रयत्न करूनही व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. शासकीय उपेक्षा पाचविलाच पुजली आहे, अशा स्थितीत आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे? असा प्रश्‍न दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला आहे. निधी वितरणाची चौकशी करून निधी गेला तरी कुठे याची माहिती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

दिव्यांगांच्या अपेक्षांना बळ देण्यासाठी अपंग वित्तीय व विकास महामंडळ आहे. या महामंडळाच्या योजनांचा निधी मिळावा यासाठी रवी पौनिकर यांच्यासह शहरातील अन्य दिव्यांग युवकांनी अर्ज केला.

कर्जाची रक्कम हाती पडावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून ते प्रयत्न करीत आहेत. महामंडळातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास गेल्या पाच वर्षांपासून शासनाने निधीच दिला नसल्याचे सांगितले जाते. यावरून सरकारचे दिव्यांगांसंदर्भातील प्रेम पुतना मावशीचे असल्याचे स्पष्ट होते, असा त्यांचा आक्षेप आहे.

शासनाची "करणी आणि कथनी'त फरक असल्याने पौनिकर यांच्या नेतृत्वात मीना शर्मा, संजय नंदनकर, इमरान अली, आहुजा, सद्दाम भाई, धर्मेंद्र निनावे, प्रेम मंदाफळे आदींनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकतेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवून वितरित केलेल्या निधीसंदर्भात माहिती मागविली आहे. 

2014 ते 2019 दरम्यान राज्य शासनाने महामंडळाला दिलेला निधी आणि निधीचे लाभार्थ्यांना केलेले वाटप याची माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सोबतच निधीसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही त्यांची मागणी आहे.

राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठी विविध योजना आहेत. महामंडळामार्फतही कर्ज देण्याची योजना आहे. परंतु, दिव्यांगांना कोणताही लाभ मिळत नाही. प्रारंभी एकएक कागद जोडण्यास सांगून वेळ वाया घालवला जातो. कागदपत्रांची पूर्तता करून मुंबईहून प्रस्ताव मंजूर झाला तर अधिकारी निधी नसल्याचे कारण सांगतात.
- रवी पौनिकर.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Pune Solapur Highway: कदमवाकवस्तीत सेवा रस्त्यालगत कचरा; अपघातांचे सत्र अन् साथीच्या आजारांचा धोका, नागरिक संतप्त

Latest Marathi News Update : नागपुरातील ८ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; प्रत्येकी १० लाखांच्या खंडणीची मागणी, अभिनेता टायगर श्रॉफच्या उदाहरणाचा धाक

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT