आगीत भस्मसात झालेले जंगलातील वृक्ष. Sakal
नागपूर

नागपूर : दीड किमीपर्यंत पिलकापर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

आग आटोक्यात आणण्यात वनविभाग अपयशी ठरला

सकाळ वृत्तसेवा

मोहपा - जिल्ह्याच्या नकाशात पिलकापार टेकड्या व सीताफळीचे जंगल म्हणून प्रसिद्ध असलेले हे जंगल सोमवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत आगीत जळून राख झाले. मोहपा येथून सात किलोमीटर अंतरावर बुधला या गावाजवळ हे जंगल आहे. आग विझविण्यास वनविभाग सपशेल अपयशी ठरला. सोमवारी सकाळी जंगलात लागलेली आग नैसर्गिकरित्या रात्री विझली, पण आग कशी लागली, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. समजविघातक घटकाद्वारे सुद्धा आग लावली असू शकते किंवा कुणी शिकारी असलेल्या घटकाद्वारे सुद्धा आग लावली जाऊ शकते, अशी चर्चा परिसरातील नागरिकांत आहे.

जंगलातून ज्या ठिकाणाहून गुरे किंवा गुराखी जातात अशा रस्त्यावर झाडें नसल्यामुळे जंगलात लागलेली आग विझली. या आगीत अनेक मोठमोठे वृक्ष, सीताफळीचे वृक्ष, अनेक औषधी वनस्पती आगीत जाळून राख झाले. लागलेल्या आगीमुळे जंगलातील पशुपक्ष्यानी जंगलाशेजारी असलेल्या मांडवी गावातील शेतांमध्ये आश्रय घेतला. यामध्ये अंदाजे २०० नीलगायी, २५० रानडुक्करे, अनेक हरीण, एक बिबट, अनेक ससे व बरेचशे विविध प्रजातीचे पक्षी मांडवी शिवारातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करत आहेत. यापुढेही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आग विझविण्यासाठी वनविभागाजवळ पुरेसे तंत्रज्ञान उपलब्ध नाहीच व स्थायी मनुष्यबळ सुद्धा नाही. आग विझविण्यासाठी फक्त चार कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध होत्या व त्या मशिन्स कंत्राटी सुरक्षा रक्षकाद्वारे हाताळण्यात आल्या, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. पर्यवारणाचे बिघडलेले संतुलन फक्त जंगलामुळेच व्यवस्थित होऊ शकते. पण वनांच्या संरक्षणासाठी वनविभाग किती जागरूक आहे, हे या घटनेवरून दिसून येते. वनविभागाच्या कर्मचाऱ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT