pin will stop snoring VNIT student Research nagpur sakal
नागपूर

एका 'पिन’मुळे घोरणे होईल बंद!

व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण संशोधन

मंगेश गोमासे

नागपूर : एकुण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक दररोज रात्री घोरतात. त्यापैकी ३० टक्के लोक श्वासनलिकेच्या अडथळ्यामुळे इतरांची झोप खराब करतात. कित्येकदा घोरणाऱ्या व्यक्तीला लाजिरवाणे वाटते. मात्र, या समस्येवर डॉक्टरांच्या मदतीने व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक अशी िपन विकसित केली ज्यामुळे घोरणे बंद होणार आहे.

घोरण्याची अनेक कारणे आहेत. नाकाचे हाड वाढल्यास अथवा जबड्याची रचना वेगळी असल्यास लोक घोरतात. झोपताना वरचा जबडा समोर आणि खालचा जबडा मागे असल्यास जीभ श्‍वासनलिकेला बंद करते. त्यामुळे घोरण्यासारखा आवाज येतो. कधी कधी हृदयापर्यंत पुरेसा प्राणवायू न गेल्यास हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून डॉक्टर सुनीता श्रीवास्तव यांच्या मदतीने एक यंत्र तयार करण्याचे आव्हान व्हीएनआयटीच्या यांत्रिकी विभागाने स्वीकारले. यासाठी बी.टेक अभ्यासक्रमातील हर्षिता वेमुला, सौम्या श्री यांनी सहयोगी प्राध्यापिका डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर यांच्या मार्गदर्शनात काम सुरू केले. यासाठी त्यांना दंत चिकित्सक डॉ. सुनीता श्रीवास्तव यांचा विद्यार्थी डॉ. जुनिअल जॉन यांनी मदत केली. त्यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी ‘पिन’ तयार केली. त्यातून घोरणे संपल्याचे दिसून आले.

वापरण्यास सोपी

स्टेनलेस स्टीलद्वारे तयार करण्यात आलेली िपन ही जवळपास सेफ्टीपिनच्या आकारची आहे. ती लावण्यासाठी व्हॅक्यूम फॉर्मिंगने तयार केलेली ‘एसेक्स शिट’मध्ये िपन अडकवून ठेवण्यात येते. त्यामुळे झोपताना वरच्या जबड्याप्रमाणे खालचा जबडा हा समोर ओढून ठेवल्या जातो. त्यामुळे योग्यरित्या श्‍वासोच्छवास होवून घोरणे बंद होते.

पाच प्रयत्नानंतर यश

डॉ. सुनिता श्रीवास्तव यांनी दिलेल्या टास्कनुसार सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकचा वापर करीत िपन तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. त्यानंतर तब्बत चार वेळा पुन्हा यंत्र तयार केले. डॉ. श्रीवास्तव यांनी त्यात बदल सुचविले. पाचव्या प्रयत्नात विद्यार्थ्यांना यश मिळाले.

ज्यांना जबड्याच्या आकाराने झोपेत घोरण्याचा आजार आहे त्यांच्यासाठी ही ‘िपन’ वरदान आहे. त्यामुळे घोरणे जवळपास संपूर्णतः बंद होईल. जबड्याच्या आकारानुसार ती तयार करता येणे शक्य होईल.

- डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर, सह्योगी प्राध्यापक, यांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT