players from nagpur university will get new synthetic track  
नागपूर

नागपूर विद्यापीठाच्या खेळाडूंना मिळणार आणखी एक सिंथेटिक ट्रॅक; तब्बल साडे दहा कोटींचा निधी मंजूर

नरेंद्र चोरे

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला अखेर मुहूर्त मिळाला आहे. टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ट्रॅकच्या कामाला सुरूवात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नागपूर विद्‌यापीठाच्या धावपटूंना सराव करता यावा तसेच शहरात राज्य व राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धांचे नियमित आयोजन व्हावे, या उद्‌देशाने विद्‌यापीठाच्या सध्याच्या शिंडर ट्रॅकवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्याचा महत्वाकांक्षी निर्णय सात वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. 

दोनवेळा टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली होती. कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले. विद्यापीठाने १०.६० कोटींचा निधीही विभागाला सुपूर्द केला. कामाला सुरुवात होणार तोच लोकसभा निवडणूक आली आणि काम थंडबस्त्यात पडले. त्यानंतर कोरोनामुळे त्यात पुन्हा व्यत्यय आला. दोनवेळा टेंडर प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यानंतर पुन्हा प्रक्रियेला गती आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅकचे इस्टीमेट तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी सीएकडे गेले आहे. त्यांच्याकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर नव्याने टेंडर व वर्कऑर्डर निघणार आहे. त्यामुळे एक ते दीड महिन्यात प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होण्याची दाट शक्यता आहे. बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. कुलगुरूंनीही ट्रॅक तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे विद्यापीठ स्वतःच्या पैशाने हा ट्रॅक बांधत आहे.

सिंथेटिक ट्रॅक आठ लेनचा राहणार आहे. याशिवाय ट्रॅकच्या बाजूला लॉंग जम्पसाठी पीट राहील. तसेच मैदानाच्या चारही बाजूंनी फ्लडलाईट्‌स असतील. खेळाडू व तांत्रिक अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही आत येऊ नये, यासाठी ट्रॅकच्या सभोवताल तारेचे कुंपणही आणि चिखल होऊ नये यासाठी आतील फुटबॉल मैदानावर कृत्रिम गवत लावण्यात येणार आहे. 

बेस, ड्रेनेज सिस्टीम आणि लेव्हलिंग झाले असल्यामुळे सिंथेटिक ट्रॅक निर्धारित वेळेत पूर्ण व्हायला मदत होणार असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. हा ट्रॅक मध्य नागपुरातील धावपटूंसाठी सोयीचा राहणार असून, विद्‌यापीठासह शहरातील इतरही युवा धावपटूंनाही याचा फायदा मिळणार आहे. शिवाय भविष्यात मोठमोठ्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजनसुद्‌धा होऊ शकेल. ट्रॅकअभावी विद्‌यापीठाला आतापर्यंत एकदाही आंतरविद्‌यापीठ स्पर्धांचे यजमानपद मिळू शकले नाही, हे उल्लेखनीय. मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकनंतर नागपुरातील हा दुसरा सिंथेटिक ट्रॅक असणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT