The plot to make teachers extra ... whose accusation  
नागपूर

शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा घाट...कुणाचा आरोप....वाचा

मंगेश गोमासे


नागपूर ः शिक्षण आयुक्तालयाने १३ जुलै २०२० ला प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संचमान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याबाबत शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना शिफारस केली. या निकषांमुळे आता महाराष्ट्रातील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार असल्याने प्रस्तावित सुधारित संच मान्यतेचे निकष तत्काळ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीने दिले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असताना शिक्षक विलगीकरण कक्षावर, सर्दी-खोकला-ताप सर्व्हेमध्ये, चेक पोस्टवर, डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याअंतर्गत सेवा देऊन कर्तव्य बजावत आहे. याशिवाय ऑनलाइन शिक्षणातही सहभागी असून विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाला मात्र शिक्षक अतिरिक्त कसा होईल याची चिंता असल्याचा आरोप शिक्षक आघाडीने केला आहे.

याबाबत महाराष्ट्र संयोजिका डॉ. कल्पना पांडे व विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू व अपर मुख्य सचिव यांना निवेदन पाठवले आहे. तसेच संचमान्यतेचे प्रस्तावित निकष तत्काळ रद्द करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी संघटनेतर्फे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT