शेतकऱ्यांची लुटीकडे नेत्यांचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांची लुटीकडे नेत्यांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांची लुटीकडे नेत्यांचे दुर्लक्ष
नागपूर

बाप रेऽऽ... ११ क्विंटलचा एक टन! लुटीकडे नेत्यांचे दुर्लक्ष

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : कोणालाही माहिती आहे की १० क्विंटलचा एक टन होतो. मात्र, बाजार समिती तो ११ क्विंटलचा एक टन होत आहे. या वजनाचा शोध कोणी लावला माहीत नाही. मात्र, शेतकऱ्यांची यातून मोठी लूट होत असल्याचे दिसून येते आहे. व्यापारी शेतकऱ्यांना वाट्टेल तसे लुटत असून याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. ही लूट केव्हा थांबेल, अशी विचारणा शेतकरी करीत आहेत.

संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्रीचा व्यवहार हा शेतातच होतो, तर काही शेतकरी त्यांचा माल बाजार समितीच्या बाजारात नेतात. पण, या दोन्ही ठिकाणी राजरोसपणे शेतकऱ्यांकडून एक टनामागे एक क्विंटल जास्त घेतात. यात ही छटाई केली जाते व तो माल फेकला जातो. फळांची खरेदी करीत असताना टनामागे एक क्विंटल कपात करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते.

भाव टनाचा असला तरी ११ क्विंटल माल घेतला होतो. हे सर्व उघड-उघड होत असले तरी मात्र शेतकऱ्यांचे वाली मौन गिळून चूप आहे. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. हा सर्व प्रकार बाजार समितीत होत असतानादेखील सर्व आलबेल असल्याचा आव आणत असताना कोणाकडे दाद मागावी, हा खरा प्रश्न आहे.

व्यापारी उचलतात शेतकऱ्यांचा फायदा

शेतकऱ्यांकडून एक टनामागे एक क्विंटलची सूट घेतली जाते. ही बाब शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्य प्रशासक, जिल्हाधिकारी, सहकार विपणन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली जाते. त्यानंतर ही खरेदीदार फळांची लिलाव पद्धतीने मार्केट यार्डमध्ये खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या गाडीतील फळांचे छाटणी केल्यानंतर पद्धतीने दोन वेळा फळांचे निश्चित केले जाते. शेतकऱ्यांना मार्केट यार्डमध्ये फळाची गाडी आणल्यानंतर गाडीचे भाडे द्यावे लागते. १०० ते १५० किलोमीटर अंतरावरून माल यार्डात आणल्यानंतर तो परत जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा फायदा व्यापारी उचलतात. व्यापारी संघाची एकी असल्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यास माल विकण्यास बाध्य केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: देशातील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

साहेबच ‘दादा’...!

Loksabha Election Result : टायगर अभी जिंदा है!

Sakal Podcast : देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार ते अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!

Murlidhar Mohol : भाजपची हॅटट्रिक; पण सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT