नागपूर

PM Modi: महाराष्ट्राच्या विकासाचं 'नक्षत्र' माहितीए का? पंतप्रधानांनी सांगितली अकरा ताऱ्यांची कमाल

पंतप्रधानांच्या हस्ते आज ७५,००० कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर इथं आज विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी या प्रकल्पांचा उल्लेख महाराष्ट्राच्या विकासाचे अकरा नक्षत्र असा उल्लेख केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदनही केलं.

मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, "आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो. आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन" ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ सिताऱ्यांचे महान नक्षत्राचा उदय होत आहे.

मोदी म्हणाले, पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. दुसरा तारा नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होईल. तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे. चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेलं आयसीएमआरचं रिसर्च सेंटर, पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर. सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प, सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन. आठवा प्रकल्प नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस, नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प, दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प, बारावा तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचं लोकार्पण आहे.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

अकरा ताऱ्यांचं हे नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देईन. नवी उर्जा देईन. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या अमृतमहोत्सवात ७५ हजार कोटी रुपयांच्या या विकास कामांना महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन. आज मी तुमच्यासमोर अकरा तारे सांगितले आहेत तेच तुमचं भविष्य बनवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT