पुरणपोळी खाल्ल्यानंतर विषबाधा झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेताना ग्रामस्थ 
नागपूर

पुरणपोळीचा पाहुणचार भोवला; एकाच घरातील सहा जणांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा

नरखेड (जि. नागपूर) : नरखेड येथून जवळच असलेल्या परसोडी (राऊत) येथील पाहुण्यांसह एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना विषबाधा (Poisoning of six members) झाली. त्यांच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्या सर्वांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी माजी उपसभापती वैभव दळवी स्वतः ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे उपस्थित होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना लगेच वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून नागपूरला पाठविण्यात आले. (Poisoning-of-six-people-in-the-same-household-in-Nagpur-rural)

मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गंगाधर दुर्वे यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्यांसह चिमुकल्या सहा जणांसाठी पुरणपोळीचा पाहुणचार करण्यात आला होता. पुरणपोळी खाल्यानंतर एकाच घरातील सहा जणांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ही बाब उपसरपंच अशोक राऊत यांनी माजी उपसभापती वैभव दळवी यांच्या कानावर घातली. दळवी यांनी तातडीने वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विषबाधा झालेल्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

विषबाधा झालेल्यांमध्ये गंगाधर दुर्वे यांच्या कुटुंबातील मुलगा अंकुश गंगाधर दुर्वे (वय ३०), सून सीमा अंकुश दुर्वे (वय २६), भाविका अंकुश दुर्वे (वय ३), अलकेश अंकुश दुर्वे (वय ११) व मुलीकडे पाहुणे म्हणून आलेले वेदांश बबलू उईके (वय ११), सुमित बबलू उईके (वय ५) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्यामुळे तातडीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

विषबाधा रसामुळे की पुरणपोळीमुळे?

सोमवारी सायंकाळी गंगाधराव यांच्याकडील पाहुण्यांना रसाचा पाहुणचार केला होता. त्याचबरोबर मंगळवारी (ता. २९) सकाळी शिजवून ठेवलेल्या पुरणाच्या पोळ्यासुध्दा त्यांच्या खाण्यात आल्या. रात्री शिल्लक असलेला रस सकाळी खाल्ल्यामुळे सर्वांना उलटी, तोंडांत फेस व पोटदुखी जाणवू लागली. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली. त्यामुळे नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे कळू शकले नाही.

(Poisoning-of-six-people-in-the-same-household-in-Nagpur-rural)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

SCROLL FOR NEXT