नागपूर

पोलिसांवर दगडफेक प्रकरण : टोलीतील आणखी नऊ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अजनी पोलिस ठाण्याच्या (Ajni Police Station) हद्दीतील रामटेकेनगर टोलीत पोलिसांची आजही धरपकड सुरू होती. पोलिसांनी (Nagpur Police) नऊ जणांना अटक केली असून, उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (police arrested 9 more people involved in Toli case Nagpur)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोलीत सुरू असलेल्या नाडेच्या जुगार अड्ड्यावर अजनी पोलिसांनी छापा घातला. अटक केलेल्या आरोपींना पोलिस वाहनातून घेऊन जात होते. दरम्यान, काही युवकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे जवळपास दोन-अडीचशे नागरिक घटनास्थळावर बघायला आले.

चारशे पोलिसांचा ताफा टोलीत घुसला. त्यांनी अनेकांना ताब्यात घेऊन मारहाण केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिलांचा समावेश होता. पोलिसांनी धरपकड मोहीम राबविली. टोळीत अवैध दारूविक्रेत्यांची मोजकीच घरे आहेत. परंतु, अजनी पोलिसांनी घटनेशी काहीएक संबंध नसलेल्यांनाही चोप दिल्याची माहिती आहे.

पोलिसांनी अनेक घरांत घुसून संसारोपयोगी वस्तू आणि नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तोडफोड केल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आज दिवसभर फिरत होते.

(police arrested 9 more people involved in Toli case Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT