{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1615119002299,"A":[{"A?":"I","A":59.64577995155844,"B":99.68816308045109,"D":727.2574531211588,"C":480.35422004844156,"a":{"B":{"A":{"A":"MAEYFArJOkQ","B":1},"B 
नागपूर

धक्कादायक! सेवानिवृत्त आर्मी जवानाच्या घरावर छापा; जीवंत काडतुससह मोठा शस्त्रसाठा जप्त 

अनिल कांबळे

नागपूर ः आर्मीतून सेवानिवृत्त झालेल्या ज सेवानाच्या घरावर सक्करदरा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पिस्तूल, जीवंत काडतुससह मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. मारूती गजानन कोठेकर (५२,रघुजीनगर ) असे आरोपी जवानाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती कोठेकर हा आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर काही दिवस त्यांनी नागपूर मनपाच्या उपद्रव पथकात काम केले होते. कोठेकर याच्या घरी तीक्ष्ण शस्त्रे आहेत अशी माहिती सक्करदरा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कोठेकर यांच्या घरी छापा घातला. 

घरझडतीत पोलिसांना पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, म्यानसह कुकरी, तलवार, छर्रा बंदूक, रायफलचा तुकडा अशी शस्त्रे मिळून आली. पोलिसांनी कोठेकर यांचा शोध घेतला असता ते मोहखेडा (मध्यप्रदेश) येथे असल्याचे समजले. लगेच पोलिसांचे एक पथक मोहखेडा येथे रवाना झाले. पोलिसांनी मोहखेडा येथून कोठेकर त्यांना ताब्यात घेतले आणि नागपूरला आणले. 

पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी घेतली. ही कारवाई ठाणेदार सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक राजू बस्तावडे पुढील तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT