Police arrested the Minor lovers 
नागपूर

रिया १७ ची तर सुशांत २० वर्षांचा; संसार फुलण्यापूर्वीच विखुरली स्वप्ने

योगेश बरवड

नागपूर : ‘त्या’ दोघांची भेट झाली... मने जुळली आणि प्रेमाचा अंकुर फुटला... घरच्यांचा विरोध लक्षात घेत त्यांनी पळून संसार थाटण्याचा निर्णय घेतला... ठरवून घराचा उंबरठा ओलांडला... मंदिरात लग्न केले... एव्हाना सुखी संसाराचे स्वप्नच रंगविणे सुरू होते... त्यातच पोलिसांची एंट्री झाली... वधू अल्पवयीन असल्याने ताटातूट निश्चितच होती... पण, त्यामुळे त्यांची स्वप्नेही विखुरली, हे विशेष...

या वास्तवकथेतील नायक आणि नायिका दोघेही मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरचे रहिवासी आहेत. रिया केवळ १७ ची तर सुशांत २० वर्षांचा. (दोघाचेही नाव बदललेले) कायद्यानुसार दोघांचेही लग्नाचे वय नाही. पण, तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच त्यांची मैत्री झाली.

प्रेम बहरू लागताच कुटुंबीयांना कुणकुण लागली आणि विरोध सुरू झाला. घरून पळून जाऊन जोडीने संसार फुलविण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दीड महिन्यापूर्वी ते घरून पळालेही. थेट दिल्ली गाठून एका मंदिरात लग्न केले.

मित्राच्या आधाराने काही दिवस तिथेच काढले. पण, मित्रावर कुठवर विसंबून राहायचे, आपली वाट धरावीच लागेल. या भावनेतून बंगळूरला जाऊन कामधंदा शोधण्याचा निर्णय घेतला. दिल्लीहून रेल्वेने बेंगळुरूकडे निघाले. तिकडे मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे नोंदविली होती. त्यानुसार पोलिस मुलीच्या मागावरच होते.

तपासादरम्यान दोघेही रेल्वेतून नागपूरमार्गे जात असल्याचे लोकेशन ग्वाल्हेर पोलिसांना प्राप्त झाले. त्यांनी लागलीच नागपूर लोहमार्ग पोलिसांसोबत संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने नागपुरात थांबणाऱ्या गाडीतील प्रत्येक डब्याची झडती घेणे सुरू गेले.

एका डब्यात दोघेही पोलिसांपासून स्वतःचा बचाव करताना दिसले. दोघांनाही ताब्यात घेऊन ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली, सोबत ग्वाल्हेर पोलिसांनाही माहिती देण्यात आली.

काही काळाचा सहवास कदाचित अखेरचा ठरावा

पोलिसांना बघून तिला धडकीच भरली. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, नवरोबाचे काय होईल या भीतीने तिने रुग्णालयात थांबण्यास नकार दिला. आज सकाळी ग्वाल्हेर पोलिस नागपूर स्थानकावर पोहोचले आणि नवदाम्पत्याला सोबत घेऊन गेले. नागपूर रेल्वेस्थानकावरील त्यांचा काही काळाचा सहवास कदाचित अखेरचा ठरावा.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT