post graduation admission process starts from 6 december
post graduation admission process starts from 6 december 
नागपूर

नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश शनिवारपासून होणार सुरू, १२ डिसेंबरपर्यंत करता येईल अर्ज

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया उद्या शनिवार (ता.५)पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना ५ ते १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. यंदा पदवी परीक्षेच्या निकालात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली गेली आहे. यामुळे काही विषयांमध्ये प्रवाशासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

नागपूर विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक विषयांचे निकाल लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी ५ डिसेंबरपासून विद्यापीठात ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रिया राबविली जाणार आहे. दोन टप्प्यात प्रवेश पूर्ण होतील. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागांसह संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश होतील. विद्यापीठ स्तरावर दोन टप्प्यातील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवर महाविद्यालय स्तरावर प्रवेश होतील. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५ ते १२ डिसेंबरपर्यंत www.rtmnu.university या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. १६ सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर १८ डिसेंबरपर्यंत त्यावर आक्षेप नोंदविता येऊ शकेल. २० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होईल. 

अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २१ आणि २२ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाची निवड करता येईल. २६ ते ३० डिसेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ३० डिसेंबरला रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल व ३० डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान दुसऱ्या टप्प्यासाठी पर्यायी अर्ज भरावा लागणार आहे. यानंतर ३ जानेवारीला प्रवेश निश्चित होतील व ४ ते ८ जानेवारीदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. १४ जानेवारीपासून नियमित वर्ग सुरू करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT