file photo 
नागपूर

खुशखबर! नागपूरच्या एम्समध्ये ऑगस्टपासून पदव्युत्तर प्रवेश 

मंगेश गोमासे

नागपूर : नागपुरात 2018 पासून मिहान येथील परिसरात "एम्स' सुरू करण्यात आले आहे. यानुसार 50 विद्यार्थ्यांचा समावेश असलेला एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली. एकाच वर्षात या अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली. गेल्या चार महिन्यांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, एम्सच्या माध्यमातून रुग्णांच्या नमुन्याची दररोज तपासणी करण्यात येते. आता एम्सकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

त्यामुळे संस्थेतून प्री-क्‍लिनिकल विषय म्हणजेच ऍनाटॉमी, फिजिऑलॉजी, बायोकेमेस्ट्री, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्माकोलॉजी, फॉरेन्सिक मेडिसीन, टॉक्‍झीकोलॉजी या पॅरा क्‍लिनिकल तर कम्युनिटी मेडिसीन या पदव्युत्तर विषयात प्रत्येकी दोन जागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. एम्स नागपूर येथे शिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा आणि क्‍लिनिकल सेवा क्षेत्रात जलद प्रगती करण्यात आलेली आहे. संस्थेद्वारे सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरविण्यात येत असून त्यामध्ये बाह्यरुग्ण, घरातील सेवा आणि शस्त्रक्रिया सुविधांचा समावेश आहे. या धाटणीत आता एम्समध्ये पदव्युत्तर विद्यार्थी (कनिष्ठ रहिवासी) आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यामुळे विभागांना आपापल्या शाखांमध्ये संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यासाठी मदत होईल. 

16 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे नागपुरात सुरू करण्यात आलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेद्वारे (एम्स) या वर्षीपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्री-क्‍लिनिकल, पॅरा क्‍लिनिकल, कम्युनिटी मेडिसीन अभ्यासक्रमांतील नऊ विषयांत सुमारे 16 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये क्‍लिनिकल विषयातील सर्वच पदव्युत्तर जागा केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. त्यामुळे एम्समध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण शिक्षण घेणे अजून सोईस्कर होणार आहे. शिवाय त्याचा फायदा रुग्णांना पुढच्या टप्प्यात मिळावा यावरही संस्थेचा भर राहणार आहे. 
-मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, एस. एम. संचालक, एम्स 
 

संपादन : मेघराज मेश्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre Monsoon Rain Maharashtra : मॉन्सूनची चाहूल! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कोकणात अलर्ट

Delhi Riots Case: उमर खालीदला दिलासा! दिल्ली उच्च न्यायालयाकडून तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : भोर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी; अवघ्या काही वेळात रस्ते जलमय

Vikas Lawande: भलत्याच व्यक्तीचा गुन्हा विकास लवांडेंच्या नावावर; पोलिस म्हणतात नजरचूक...

NAFED Onion Procurement : कांदा दराबाबत आता होणार 'दूध का दूध, पाणी का पाणी'! प्रत्येक बाजार समितीच्या गेटवर होणार 'हा' मोठा बदल; खरेदीचा वेग मंदावल्याने नाराजी

SCROLL FOR NEXT