Powerful Woman
Powerful Woman Powerful Woman
नागपूर

पावरफुल वुमन : शिक्षणातून साधले यशाचे ‘व्यवस्थापन’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एकेवेळी ‘इंटर्न’ म्हणून कामाची सुरुवात करीत अगदी यशाच्या शिखरावर मजल मारणे तसे सोपे नाही. मात्र, आपल्यातील शिक्षणाची ओढ, जिद्द आणि चिकाटीच्या भरवशावर ते यश साध्य करण्याची किमया सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या प्राचार्य आणि संस्थेच्या विश्‍वस्त म्हणून डॉ. आमिषी अरोरा यांनी साध्य केली आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी ‘शेल्स ॲडव्हरटायझिंग एजन्सीमध्ये ‘इंटर्न’ म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्याच ठिकाणी अकाऊंट डायरेक्टर म्हणून काम बघितले. त्यानंतर ‘ऑलरॉईट मर्सेटाईल’ कंपनीच पार्टनर म्हणूनही काम केले. यादरम्यान त्यांचे लग्न झाले. मात्र, लग्नाच्या दिवशीच त्यांच्या शिकविण्याच्या वैविध्यपूर्ण शैलीने चक्क विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. जाल. पी. गिमी यांनी त्यांना विद्यापीठाच्या एमबीए विभागात शिकविण्यासाठी येण्यास सांगितले.

दोन ते तीन महिन्यानंतर त्यांनी यावर विचार करीत विभागात तासिका तत्त्वावर ‘मार्केटिंग’ विषय शिकविण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकविण्याच्या तळमळीमुळे पुढे भारतीय विद्याभवन येथेही त्यांना ‘इव्हीनिंग कोर्सेस’ शिकविण्यास सुरुवात केली. पुढे जी. एस. कॉमर्स आणि तिरपुडे महाविद्यालयात त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली. यानंतर २००३ साली त्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च संस्थेत शिकविण्याची संधी मिळाली.

याच ठिकाणी त्या नियमित प्राध्यापिका झाल्यात आणि काही वर्षातच कार्यकारी प्राचार्य पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. यादरम्यान त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाने महाविद्यालयाची घडी सांभाळून अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिवाय नियमित प्राचार्य म्हणूनही काम केले. यानंतर ‘एनवायएसएस’मध्येही त्यांनी यशस्वीरीत्या प्राचार्यपद सांभाळले. मात्र, पुन्हा त्यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चमध्ये परत येत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळली. संस्थेने त्यांच्या कामाची पावती देत, त्यांना विश्‍वस्त म्हणूनही जबाबदारी दिली. याशिवाय संस्थेच्या शाळेचे नियोजन करण्याचीही जबाबदारी दिली.

अनेक पुरस्काराने सन्मान

महाविद्यालयाची जबाबदारी सांभाळताना, त्यातून गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी डॉ. आमिषी अरोरा यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यातून यशस्वीरीत्या महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करवून घेतले. त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेमुळे त्यांना ॲकॅडमिक लिडर ऑफ इयर पुरस्कार, देवांग मेहता फाउंडेशनचा व्युमन लिडरशिप अवार्ड, एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड आणि इतर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्या गेल्या अनेक वर्षांपासून कॉर्पोरेट ट्रेनिंगही घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT