Prashant Kishor sakal
नागपूर

प्रशांत किशोर देणार स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बुस्टर

प्रख्यात रणनितीकार प्रशांत किशोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बुस्टर डोस देणार असल्याने पुन्हा विदर्भाची चळवळ जोर धरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजेश चरपे

प्रख्यात रणनितीकार प्रशांत किशोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बुस्टर डोस देणार असल्याने पुन्हा विदर्भाची चळवळ जोर धरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपूर - प्रख्यात रणनितीकार प्रशांत किशोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बुस्टर डोस देणार असल्याने पुन्हा विदर्भाची चळवळ जोर धरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते २८ सप्टेंबरला नागपूरला येत आहेत.

२०१४ साली मोदींचा विजयात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा मोठा वाटा आहे. त्यानंतर पंजाब, बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्लीच्या निवडणुकांमध्ये त्यांची रणनीती यशस्वी राहिली. आता ते विदर्भाच्या आंदोलनात उडी घेणार आहेत. विदर्भ राज्याचे खंदे समर्थक, माजी आमदार आशिष देशमुख यांनी त्यांना प्रस्ताव दिला होता. तो त्यांनी मान्य केला आहे.

दोन-अडीच महिन्यांपासून विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये वेगळ्या विदर्भासाठी काम करणाऱ्या लोकांची एक टिमसुद्धा त्यांना भेटून आली आहे. त्याचा अहवाल प्रशांत किशोर यांना देण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात झुम मिटींगच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना संबोधित केले. २८ सप्टेंबर १९५३ साली झालेला नागपूर करार, संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर झालेली अधोगती, अन्याय, दिलेली व न पाळलेली आश्वासने याची माहिती त्यांना देण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

ही बाब त्यांच्याही लक्षात आली. त्यामुळे ते रणनीती आखणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरला नागपुरात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे, असल्याचे देशमुख यांनी सांगितले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांसह काँग्रेसच्याही नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी वेळोवेळी केली आहे. भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल असे आश्वासन येथील जनतेला दिले होते याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT