Prepare for the Competition Exam online 
नागपूर

Sunday Special : घरी बसून असा करा स्पर्धा परीक्षांचा ऑनलाइन अभ्यास...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांकडे तरुणाईचा कल वाढला आहे. यासाठी अनेक तरुण हे दिल्ली, मुंबई, पुणे आदी ठिकाणी शिकवणी लावून अभ्यास करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी हे आपली पुस्तके न घेताच गावी परतले आहेत. देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी या काळात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून एमपीएससी, यूपीएससीचा ऑनलाइन अभ्यास करावा असे आवाहन प्राध्यापकांनी केले आहे. 

आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या काळात प्रत्येक तरुण हा शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड करीत आहे. यासाठी दिवसरात्र अभ्यास करीत असतो. यात एरवी अभ्यासासाठी ग्रंथालयांमध्ये पुस्तकांच्या गराड्यात बसलेले तरुण पाहणे नित्याचे असले तरी सध्या कोरोना व्हायरसच्या धास्तीने हे तरुण आपल्या गावी घरातच बसून आहेत. तब्बल 21 दिवस घरातच रहावे लागणार असल्याने तरुणांना आपला अभ्यास बुडण्याची मोठी चिंता लागून आहे. 

परीक्षेची तारीख पुढे ढकलली असली तरी पुस्तके सोबत नसल्याने त्यांचा वेळ वाया जात आहे. मात्र, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना पुस्तके नाही म्हणून घरी रिकामे न बसता सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत अभ्यास करता येणार आहे. यासाठी इंटरनेटवर विविध वेबसाईट आहेत. ज्या अपडेट देखील करण्यात आल्या आहे. या वेबसाइटचे लाखो युजर्स असले तरी या काळात नेहमीच्या तुलनेत अधिक विद्यार्थ्यांनी साईटचा वापर करावा. परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली असली तरी लवकरच परीक्षा होणार असल्याने या विद्यार्थ्यानी तंत्रज्ञानाचा वापर करीत अभ्यास करावा. 

या आहेत महत्वाच्या साईट

  • मिशन एमपीएससी 
  • गव्हर्नमेंट अड्डा 
  • एमपीएससी कट्टा 
  • एमपीएससी ट्रिक्‍स 
  • पीडीएफ फॉर एक्‍झाम 
  • यूपीएससी मटेरीअल 
  • एमपीएससी अलर्ट 
  • युएन कॅडमी 
  • एमपीएससी ठोकळा 

पीडीएफसह व्हिडिओ देखील उपलब्ध

स्पर्धा परीक्षांसाठी असलेल्या या वेबसाईटवर माहितीसह काही पुस्तकांचे पीडीएफ देखील उपलब्ध आहेत. सोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते. तसेच अभ्यास करण्यास अडचणी देखील येत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

SCROLL FOR NEXT