Maharashtra Prisons and Correctional Services Act 2024 sakal
नागपूर

Nagpur : राज्यातील कारागृहांचा नव्या सुधारणेत समावेश; महिला कैद्यांसाठी स्वतंत्र इमारत

Nagpur Latest News In Marathi : प्रवेशद्वारासह सुविधा वाढविण्यावर भर स्थान; विधेयक नुकतेच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आले.

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा, नीलेश डोये

Nagpur News : राज्यातील येरवडा तुरुंग वगळता सर्वच कारागृहात महिलांसाठी वेगळ्या इमारतीची व्यवस्था नाही. त्यामुळे आता येरवडा कारागृहाच्या धर्तीवर महिला कैद्यांसाठी स्वतंत्र इमारत तयार करण्याचा मानस राज्याच्या गृहविभागाचा आहे. त्यासाठी सरकार कारागृह व कैद्यांसंदर्भात नवीन नियमावली तयार करण्याच्या विचारात आहे. हे विधेयक नुकतेच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आले.

कारागृहात शिक्षापात्र व न्यायालयीन बंदींना ठेवण्यात येते. शिक्षापात्र कैद्यांकडून कामही करून घेण्यात येते. यासाठी त्यांना मोबदला देण्यात येतो. कारागृहात महिला व पुरुषांचा समावेश आहे. दोघांनाही वेगवेळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मात्र, महिलांसाठी येरवडा कारागृह वगळता इतर कुठल्याही कारागृहात स्वतंत्र अशी इमारत नाही. त्यामुळे नव्या प्रस्तावित नियमावलीनुसार दोघांसाठी स्वतंत्र इमारत तयार करण्यावर सरकार विचार करीत आहे. याशिवाय महिलांना ने-आण करण्यासाठी प्रवेशद्वारही वेगळे असेल. त्यामुळे कारागृहात दोन द्वार करावे लागणार आहे.

महिलांच्या कैद्यांच्या इमारतीत फक्त महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात येणार असून पुरुष अधिकाऱ्यास येण्यास परवानगी राहणार नाही. विशेष म्हणजे, आकस्मिक परिस्थितीत वा गुन्ह्याच्या संदर्भातच प्रभारी अधीक्षकाला या इमारतीमध्ये प्रवेश दिला जाईल.

कैद्यांसाठी कल्याण निधी

कैद्यांसाठी एक कल्याण निधीही तयार करण्यात येणार आहे. या निधीचा वापर कैद्यांच्या कल्याणसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी होईल.

रुग्णालयातही स्वंतत्र कक्ष

कारागृह रुग्णालयात महिलांसाठी स्वंतत्र कक्ष असेल. या कक्षात फक्त महिला कर्मचारीच राहतील. महिला कैदी गर्भवती असल्यास तिच्या आरोग्य विषयक सुविधेसोबत आहाराची व्यवस्था असेल.

तिला सहा वर्षांपर्यंत मुलाला सोबत ठेवता येईल. कैद्याचा मृत्यू झाल्यास आजारपणासोबतच तिच्यावर केलेल्या उपाराचाही माहिती द्यावी लागेल. तिची आजाराबाबतची पहिली तक्रार, तिचा आहार, केलेली कामे, रुग्णालयात दाखल केलेली तारीख, शवविच्छेदन अहवाल आदी नोंदी प्रशासनाला ठेवाव्या लागतील.

प्रकारानुसार कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था

दिवाणी कैदी, दोषसिद्ध कैदी, न्याय चौकशीधिन कैदी, स्थानबद्ध कैदी, सराईत कैदी, मृत्यदंडाची शिक्षा झालेले कैदी, दयेचा अर्ज फेटाळलेले कैदी आदी प्रकरांमध्ये कैद्यांची वर्गवारी करण्यात येणार आहे. त्यानुसारच त्यांना ठेवण्याची व्यवस्थाही केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

Latest Marathi News Live Update: रयत शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणधीन इमारतीचा स्लॅब कोसळला

Horoscope Prediction : 1 फेब्रुवारीला बनतोय रवी पुष्यचा अत्यंत शुभयोग; या पाच राशींना मिळणार भरभरून लाभ

Dhule News : सावधान! मृत किंवा अपात्र सदस्यांची नावे स्वतःहून कमी करा, अन्यथा धुळे जिल्हा प्रशासनाचा कारवाईचा इशारा

IND vs NZ, 5th T20I: काळजी करू नका संजू सॅमसन..., टॉस जिंकल्यावर सूर्यकुमारने जाहीर केले प्लेइंग इलेव्हनमधील मोठे बदल

SCROLL FOR NEXT