Vijay-Barse 
नागपूर

स्लम सॉकर'चे प्रणेते प्रा. विजय बारसे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विजयपर्व

सकाळ वृत्तसेवा

  नागपूर  : विजय बारसे या नावाला जागतिक ओळख आहे. कारण त्यांनी स्लम सॉकर'च्या माध्यमातून झोपडपट्टीतील गोरगरीब मुलामुलींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली आहे.  फुटबॉल प्रशिक्षक व 'झुंड' चित्रपटाचे खरे नायक प्रा. विजय बारसे हे येत्या दोन मे रोजी 75 व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. यानिमित्त वर्षभर विजयपर्व साजरे करण्यात येणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.                                                                             भंडारा येथे जन्मलेले व हिस्लॉप महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्रा. बारसे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 2 मे 2020 ते 2 मे 2021 हे संपूर्ण वर्ष देशविदेशात विजयपर्व म्हणून साजरे करण्यात णायेर आहे.                                                           त्यांच्या अम्रुत महोत्सवानिमित्त  9 हजार 999 व्यक्ती नेत्रदान करणार असून, याचा 2 हजार 222 अंधांना लाभ होणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या 2 हजार 500 प्रती वितरित करण्यात येणार आहेत.  ११ हजार वृक्ष विविध धार्मिक, शैक्षणिक व  सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. विजयपर्व काळात अकरा ठिकाणी रक्तदान व ५१ रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मॅरेथॉन, निबंध, सायकल, स्लोगन, रांगोळी, चित्रकला, जलतरण व वादविवाद स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे.  

सविस्तर वाचा - विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित...हे आहे कारण                                                                                       या निमित्ताने नागपूरसह विविध शहरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रा. बारसे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येईल. प्रा. बारसे यांच्या जीवनकार्यावर आधारित 'झुंड' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सैराट फेम सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

SRH vs LSG: २६ वर ४ विकेट्स... शमी ऑन फायर! दोन चेंडूवर अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेडला धाडलं माघारी; इशानही स्वस्तात बाद, Video

'मी आणि गुलजार यांनी एकमेकांना शॉर्टमध्ये जास्त बघितलंय' जुन्या ट्रोलिंगवर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या...'टेनिससाठी आम्ही...'

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'

SCROLL FOR NEXT