file photo 
नागपूर

नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्यांना वरिष्ठांचे अभय?

नीलेश डोये

नागपूर  :सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी काही दिवस कार्यरत होते. त्यांनी कामकाजाच्या फाईलीही हाताळल्या. यामुळे चर्चांना उधान आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कृतीबद्दल कारवाई करणे गरजेचे होते. पण तसे झाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नारजी आहे. नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्यांना वरिष्ठाकडून अभय मिळत असेल तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना मंत्र्यांकडून मुदतवाढचे आश्वासन मिळाल्यामुळे ते आपल्या पदावर कायम राहिले. त्यांनी कुणालाही पदभार दिला नाही. नियमित कामकाज करू लागला. ही बाब जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच चर्चेला आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा ही माहिती मिळाली. परंतु त्यांना कुणीही थांबविले नाही किंवा विचारणाही केली नाही. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर कृषी व पशुसंवर्धन सभापतीनेही मौन बाळगले. याच दरम्यान त्यांच्याकडून काही फाईलही हाताळण्यात आल्या. एका फाईलवर त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याची माहिती आहे. माध्यमांमध्ये माहिती आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. ते ही कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले.

शेट्टेंकडे अतिरिक्त प्रभार
सहाय्यक उपायुक्त निरंजन शेट्टे यांच्याकडे प्रशासनाने पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. तसे पत्र आज काढले. त्यांनी तातडीने पदभार स्वीकारल्याची माहिती आहे.

कारवाई करावी
सेवानिवृत्त झाल्यावर कार्यलयात बसण्याचा अधिकार नाही. डॉ. ठाकरे यांचे कृत्य नियमबाह्य आहे. त्यांनी फाईली हाताळणे तर गुन्हाच आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सीईओंकडे करण्यात येईल.
अनिल निधान, विरोधी पक्ष नेते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

SCROLL FOR NEXT