Nagpur Police Bharat Mukti Morcha esakal
नागपूर

Nagpur : संविधानविरोधी म्हणत RSS च्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; 100 जण ताब्यात, कलम 144 लागू

आरएसएस कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आरएसएस कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) नागपुरातील (Nagpur) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा घेराव भारत मुक्ती मोर्चा (Bharat Mukti Morcha) नावाच्या संघटनेनं घातला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्यालयाबाहेरून 100 जणांना ताब्यात घेतलं आहे.

याशिवाय, आरएसएस कार्यालयाबाहेरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. वामन मेश्राम (Waman Meshram) यांच्या नेतृत्वाखालील भारत मुक्ती मोर्चानं आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि संघटनेची विचारधारा भारतीय संविधानानुसार नाही, अशी टीका केली. दरम्यान, पोलिसांनी वामन मेश्राम यांना ताब्यात घेतलंय.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळं पोलिसांनी हा मोर्चा पुढं जाऊ दिला नाही. पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी इंदोरा चौकातच धरणे सुरू केले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजीही केली. शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्यामुळं भारत मुक्ती मोर्चा संघटनेला पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे.

यासोबतच मुंबई उच्च न्यायालयानं वामन मेश्राम यांची याचिका फेटाळून लावत पोलिसांकडं अर्ज करून 6 ते 9 ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिलेत. न्यायालयाकडून परवानगी न मिळाल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त होता. मात्र, वामन मेश्राम आणि त्यांची संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नागपूर शहर पोलिसांनी सुरक्षेसाठी संपूर्ण इंदोरा परिसरात कलम 144 लागू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT