Psychiatric Hospital  sakal
नागपूर

नागपूर : अनामिकांचे नामकरण करणारे मनोरुग्णालय!

अडीचशे मनोरुग्ण अनोळखी; उपचारातून बरे झालेल्या १७ मनोरुग्णांचे पुनर्वसन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वे, बस स्थानकावर भटकंती करीत असलेला व्यक्ती असो की, रस्त्यावर सापडलेल्या बेवारसाला पोलिसांच्या मदतीने मनोरुग्णालयात दाखल करतात, अशा अडीचशे मनोरुग्णांना ‘नाव’ देऊन देण्याचे सत्कर्म मनोरुग्णालयाने केले आहे. तर येथील मनोरुग्णांच्या जगण्याला ‘अर्थ’ प्राप्त करून देण्याचा उपक्रम टाटाच्या सहकार्यातून प्रादेशिक मनोरुग्णालयाने सुरू केला आहे. नुकतेच १७ जणांचे सामाजिक पुनर्वसनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

चाळीस वर्षांपासूनचे काही मनोरुग्णांना कोणीही भेटायला आले नाही, अशा मनोरुग्णांचे पालकत्व मनोरुग्णालयाचे प्रशासनाने स्वीकारले आहे. यातील अनेक जणांनी मानसिक विकारावर विजय मिळवला, परंतु घर कुठे आहे हेच त्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी आता मनोरुग्णालय हेच त्यांचे घर.

महाराष्ट्र नव्हे तर मध्य देशातील विविध भागातून येणाऱ्यांना मनोरुग्णालयात दाखल केले जाते. वीस वर्षांचा मुलगा वेड्यासारखा वागत असल्याची शंका आल्याने नातेवाइकांनी उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. खोटा पत्ता देऊन युवकास मनोरुग्णालयात दाखल केले. अशी एक नव्हेतर अनेक प्रकरणं आहेत. बरे न होऊ शकणाऱ्या मनोरुग्णांना ठेवूनही घेतले जाते; यातील अनेक जण बरे होतात.

आज घडीला २३५ पेक्षा अधिक मनोरुग्ण अनोळखी आहेत. त्यांच्या घरचा पत्ता नाही, मात्र मनोरुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांपासून तर अटेन्डंट हेच त्यांचे नातेवाईक. दिवाळी असो की, दसरा हे सण साजरे करतात, तर दाखल केल्याची तारीख त्यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो, यात टाटा ट्रस्टचे मोलाचे सहकार्य आहे.

कर्मचारीच करतात अंत्यसंस्कार

जन्म कुठला आहे, हे माहीत नाही. मात्र मानसिक विकारामुळे ते मनोरुग्णालयात पोचले. मनोरुग्णालयाच्या अंगणात डॉक्टरांच्या उपचारातून सुधरल्याने आयुष्याचा बदललेला प्रवास सुरू आहे. पंचविस वर्षांपूर्वी दाखल झालेला मनोरुग्ण आता आयुष्याच्या उत्तरार्धात पोहचले. वयस्क झाल्याने अनेकजण मृत्यू पावतात. त्यांच्यावर मनोरुग्णालयाचे कर्मचारीच नातेवाईक म्हणून अंत्यसंस्कार करतात.

''मनोरुग्णाला हक्क आणि अधिकार आहेत, हे समजून घेण्यास नातेवाईक तयार नाहीत. दुर्दैवाने बरे झालेल्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन जात नाहीत. दाखल करताना अनेकजण खरा पत्ताही देत नाही. सध्या २३५ पेक्षा अधिक मनोरुग्ण अनोळखी आहेत. त्यांचा पत्ता नाही. आतापर्यंत हजारो मनोरुग्णांचे नामकरण मनोरुग्णालयाने केले आहे.''

-डॉ. पुरुषोत्तम मडावी, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT