Pvt. Saibaba Corona Positive after arun gawali 
नागपूर

नागपूरच्या कारागृहात चाललं काय! डॉन अरुण गवळीनंतर प्रा. साईबाबासह आणखी पाच कैद्यांना कोरोना

अनिल कांबळे

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माओवादी प्रा. जी. एन. साईबाबासह आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे कारागृहातील बंदीवान व प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी डॉन अरुण गवळीसह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह कैद्यांची संख्या आता दहा झाली आहे. एक रक्षकही पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.

प्रा. साईबाबासह कारागृहातील बंदीवानांची तपासणी करण्यात आली. शनिवारी प्रा. साईबाबासह पाच जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल कारागृह प्रशासनाला मिळाला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने साईबाबासह पाच जणांना मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वृत्ताला कारागहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दुजोरा दिला आहे.

२८ ऑगस्ट २०१३ ला पोलिसांनी अहेरीच्या बसस्थानकावरून हेम मिश्रा, महेश तिरकी आणि पांडू नरोटे या तिघांना अटक केली. त्यावेळी हेम मिश्राकडून १६ ‘जीबी’चा पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला.

यात गडचिरोलीतील जहाल माओवादी नर्मदाक्का, प्रकाश आणि इतरांसाठी अनेक संदेश होते. त्यानंतर काही दिवसांनी भूमिगत माओवादी रामदार याला भेटण्यासाठी देवरी-चिचगड मार्गाने गडचिरोली दाखल होणाच्या प्रयत्नातील प्रशांत राही व विजय तिरकीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याकडून मिळालेल्या दस्तावेजांची तपासणी पोलिसांनी केली. दिल्ली विद्याापीठाशी संलग्नित असलेल्या रामलाल आनंद महाविद्याालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेला प्रा. जी. एन. साईबाबाचे नाव पोलिसांसमोर आले. पोलिसांनी साईबाबालाही अटक केली. याप्रकरणात गडचिरोली सत्र न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने साईबाबासह अन्य आरोपींना शिक्षा ठोठावली. तेव्हापासून साईबाबा नागपूर कारागृहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT