railway.jpg 
नागपूर

बाप रे ! पंधरवड्यात 9 हजार फुकट्यांनी केला प्रवास

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पंधरवड्यादरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात एकूण 9 हजारांवर फुकट्यांना दंड ठोठावण्यात आला. याशिवाय अस्वच्छता पसरविणाऱ्या 104 जणांवरही कारवाई करण्यात आली.
नागपूर विभागात 1 ते 14 मार्च दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. मुख्य रेल्वेस्थानकांसोबतच विभागातून धावणाऱ्या तब्बल 330 प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. एकही प्रवासी तपासणी शिवाय रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडू शकणार नाही, किंवा प्रवासही करू शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. पंधरवड्यात एकूण 9 हजार 747 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 24 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणारे 1 हजार 65 जण समोर आले, त्यांच्याकडून 5 लाख 68 हजार 575 रुपये, अनियमित डब्यातून प्रवास करणाऱ्या 2 हजार 867 जणांकडून 12 लाख 63 हजार रुपये वसूल करण्यात आले. नोंदणीशिवाय मालवाहतुकीची 5 हजार 815 प्रकरणे समोर आली. संबंधितांकडून 5 लाख 69 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रवाशांवर कारवाई

या अभियानादरम्यान रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता पसरविणाऱ्यांकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले होते. अस्वच्छता पसरविणाऱ्या 104 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 10 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जनजागृती करण्यात आली

कारवाईदरम्यान कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचावासंदर्भात जनजागृती करण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान आवश्‍यक काळजी घ्या. खोकताना किंवा शिंकताना तोंडापुढे रुमाल धरणे या शिष्टाचाराचे पालन करावे. खोकला, ताप, श्‍वसनाचे आजार असणाऱ्या व्यक्तीपासून अंतर कायम ठेवण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांच्या मार्गदर्शनात आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनुराग कुमार सिंह, सहायक विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जितेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात संपूर्ण विभागात अभियान राबविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT