"Rain of complaints on social media about this exam 
नागपूर

"या' परीक्षेबाबत सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत बरीच संभ्रमावस्था असल्याने विद्यार्थ्यांकडून सोशल मिडियाचा वापर करीत अक्षरश: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) तक्रारीचा पाऊस पाडला आहे. या प्रकाराने एआयसीटीईने त्रस्त होऊन परीक्षेसंदर्भातील तक्रारी स्वत:च्या विद्यापीठांकडे तक्रारी देण्याचे परिपत्रक काढून प्राचार्यांना पाठविले आहे.

राज्यभरातील विद्यापीठांद्वारे अभियांत्रिकीसह इतर व्यावसायीक अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत सध्या चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यपालांनी याबाबत आपला नकार कळविला आहे. त्यामुळे या परीक्षा होईल किंवा नाही याबाबत शाशंकता आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये बरेच अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे बऱ्याच अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी सोशल मिडियावर राण पेटवले आहे.

एआयसीटीद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवल्या जाते. मात्र, परीक्षेसंदर्भातील कुठलेही अधिकार एआयसीटीईकडे नाही. याबाबत यापूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने अहवाल तयार करुन राज्यांना दिशानिर्देशाचे पालन करुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे एआयसीटीईने परिपत्रक काढून त्यात ज्या विद्यार्थ्यांना तक्रारी आहेत, किंवा ज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सूचना करायच्या आहेत, त्यांनी संबंधित विद्यापीठांकडे देण्याचे कळविले आहे. याबाबत सर्वाधिकार विद्यापीठांकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र, सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुठलाच निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT