Rakhya for the soldiers sent by the sisters 
नागपूर

सीमेवरच्या भावाचा हात रिता राहू नये म्हणून... 

अतुल मांगे

नागपूर : कोरोनामुळे अवघे विश्व होरपळून निघाले असून, हा जीवघेणा विषाणू कधी जाणार, हा एकच विचार प्रत्येकाच्या मनात आहे. सकाळनेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा सीमेवर पाठवा राख्या अभियानाला थांबा दिला. परंतु रक्षाबंधनासारख्या सणाला भावाचा हात रिता राहू नये, या तळमळीने अनेक बहिणींनी स्वयंस्फूर्तीने सकाळकडे पाठविल्या. सकाळही आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत त्या राख्या सीमेवर पोहचत्या करणार आहे. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, जिजाऊ ब्रिगेड आणि रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राने सीमेवरच्या जवानांसाठी राख्या पाठविण्यासाठी सकाळच्या सुपूर्द केल्या. रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी सकाळद्वारे सीमेवर पाठवा राख्या उपक्रम राबवला जातो. तुम्ही सीमेवर खडा पहारा देता म्हणून आम्ही सुखाची झोप घेऊ शकतो. सीमेवर तुम्ही एकटे नाही तर संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, ही भावना त्यामागे असते.

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. परंतु काही बहिणींनी सकाळकडे राख्या आणून दिल्या. यात नंदा देशमुख, अरुणा भोंडे, प्रांजली ताल्हन, वृंदा ठाकरे, सुषमा भड, कल्पना मानकर, अर्चना बर्डे, समीक्षा गणेशे, अनिता ठेंगरे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जिचकार, जया देशमुख, सुषमा साबळे, साधना बोरकर, सीमा टालाटुले, वर्षा भोयर, स्वाती शेंडे, सोनाली दळवी यांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

Akkalkot Karhunnavi: कारहुण्णवी सणाची लगबग! अक्कलकोटच्या बाजारपेठा सजल्या; बैलांच्या सजावटीच्या साहित्याला वाढती मागणी

'माझी नात मोदींची पूजा करत त्यांच्या फोटोला लाडू भरवते' सुनील शेट्टी म्हणाला...'माझं मोदींजीवर प्रेम आहे.'

Animal Story : कोल्ही–करकोचा प्रेमकथा: जातीपाती, अहंकार आणि अपमानाच्या पलीकडचा धडा

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

SCROLL FOR NEXT