Ram Jhula Accident Sakal
नागपूर

Ram Jhula Accident : रितूला तहसील पोलिसांच्या तांत्रिक चुकीचा पुन्हा फायदा; जेएमएफसी न्यायालयाने अर्ज फेटाळला

रामझुला हिट ॲण्ड रन प्रकरणात रितू उर्फ रितीका मालूच्या अटकेसाठी पोलिसांनी केलेल्या अर्जात पुन्हा एकदा तांत्रिक चूक झाली असून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) हा अर्ज फेटाळून लावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : रामझुला हिट ॲण्ड रन प्रकरणात रितू उर्फ रितीका मालूच्या अटकेसाठी पोलिसांनी केलेल्या अर्जात पुन्हा एकदा तांत्रिक चूक झाली असून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) हा अर्ज फेटाळून लावला आहे.

तहसील पोलिसांनी रितूची केलेली अटक यापूर्वी मागील आठवड्यामध्ये जेएमएफसी न्यायालयाने बेकायदेशीर ठरविली होती. आजच्या अर्जामुळे तहसील पोलिसांच्या चुकांमध्ये भर पडली असून रितूच्या अटकेसाठी केलेला अर्ज न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळून लावला.

रितूने २४ फेबुवारी रोजी रात्री रामझुला परिसरात दारूच्या नशेत कारने दुचाकीला धडक दिली. यात मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा व मोहम्मद अतीफ या दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रितू व माधुरी घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर चार महिन्यांनंतर रितूने सोमवारी तहसील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गेल्या आठवड्यात पोलिसांनी रितूला न्यायालयात हजर केले. तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर ७ मार्च रोजी पोलिसांनी तिच्या अटकेसाठी न्यायालयात धाव घेतली होती.

पण न्यायालयाने शासनाची विनंती फेटाळली. पुढे अटक टाळण्यासाठी रितूनने याच न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयात प्रलंबित असल्याने रितूला पोलिस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. रितूतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी व शासनातर्फे ॲड. मेघा बुरंगे यांनी बाजू मांडली.

सत्र न्यायालयात अर्ज करणे अपेक्षित

रितूच्या अटकेला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नकार दिला होता. तरीसुद्धा पोलिसांनी परत याच न्यायालयापुढे अटकेसाठी अर्ज केला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला पोलिसांनी सत्र न्यायालयापुढे आव्हान देणे अपेक्षित होते. स्वत:च्याच निर्णयाचा आढावा घेऊन त्यावर निकाल देण्याचा अधिकार प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाला नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT