Ram Navami 2024 esakal
नागपूर

Ram Navami 2024 : रामनवमीच्या शोभायात्रेत सव्वाशे चित्ररथांचा सहभाग, भारतीय संस्कृतीचे होणार दर्शन

Ram Navami 2024 : रामनामाच्या जयघोषासह उद्या शोभायात्रा; भारतीय संस्कृतीचे होणार दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Ram Navami 2024 : प्रभू श्रीरामाचे स्मरण करीत दरवर्षी नागपुरातून निघणारी शोभायात्रा विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. नावीन्यपूर्ण संकल्पनांचे देखणे चित्ररथ, सांस्कृतिक दृष्ये आणि भव्य अशा उत्सवाचे चोख नियोजन, हे या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाचे गमक आहे.

याच पावलावर पाऊल ठेवत अन्‌ अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्षी निघणाऱ्या यंदाच्या शोभायात्रेमध्ये एकूण सव्वाशेवर चित्ररथातून भगवान श्रीरामासह देवी-देवतांचे दर्शन नागपूरकरांना होणार आहे.

पोद्दारेश्‍वर राममंदिराचे ५८ वे वर्ष

श्री पोद्दारेश्‍वर राम मंदिरातर्फे श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे हे ५८ वे वर्ष असून बुधवारी (ता. १७) दुपारी ४ वाजता ‘रामलल्ला रथा’सह शोभायात्रेला प्रारंभ होईल. यंदा लक्षवेधी अशा ८० चित्ररथांचा समावेश शोभायात्रेत असणार आहे.

भगवान श्रीरामासह माता जानकी, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमानाची रामल्लांच्या रथावर मंत्रोच्चारांनी पूजा केली जाईल. त्यानंतर, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, डॉ. नितीन राऊत, प्रवीण दटके, सुनील केदार, कृपाल तुमाने, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल सोले, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये आरती होईल. नंतर मान्यवर व भाविक दोरीने रथ खेचतील.

शोभायात्रा पोद्दारेश्‍वर मंदिरातून इतवारी शहीद चौक, महाल, कॉटन मार्केटमार्गे सीताबर्डी येथे पोहोचेल. सेवेत १ हजार २०० श्रीराम भक्त असतील. मार्गावर चौका-चौकात रोषणाई केली जाईल. तत्पूर्वी, पहाटे ४ वाजता उथ्थापन, मंगल आरती, अभिषेक, अभ्यंगस्नान, ५ वाजता सनई वादन, ९ वाजता श्रीरामकृष्ण मठातर्फे श्रीराम कीर्तन, १० वाजता भजन आदी कार्यक्रम होतील.

स्केटिंगद्वारे नृत्याचे सादरीकरण

शोभायात्रेत भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता दर्शविणारी विविध प्रदेशातील लोकनृत्य सादर केली जाईल. यामध्ये, शैलेंद्र पाराशर यांच्या नेतृत्वाखाली गांधीबाग रोलर स्केटिंग क्लब, कमलेश पाडे यांच्या नेतृत्वाखाली लोटस रोलर स्केटिंग क्लब, लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे स्केटिंगद्वारे नृत्याचे सादरीकरण होईल. शिवाय, विविध संस्थांतर्फे लोकनृत्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : सीमाप्रश्‍नावरून पुन्हा वाढला तणाव; महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळकेंवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT