Ramayana again for the success of the shutdown 
नागपूर

सीता राम चरित अति पावन|, मधुर सरस अरु अति मनभावन||

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीता राम चरित अति पावन ।
मधुर सरस अरु अति मनभावन ॥
पुनि पुनि कितनेहू सुने सुनाये ।
हिय की प्यास भुजत न भुजाये॥

एकेकाळी रस्त्यांवर संचारबंदीसदृश चित्र निर्माण करणारे "रामायण' शनिवारपासून पुन्हा दूरदर्शन वाहिनीवर सुरू झाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या यशासाठी "रामायण' पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीनंतरही नागरिक रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यावर उतारा म्हणून केंद्र सरकारने ही मालिका पुन्हा सुरू केली आहे. 

जगात हाहाकार माजवणाऱ्या "कोरोना'ने देशही कवेत घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकार विविध प्रयत्न करीत आहेत. यात आता "रामायण' मालिका पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचाही समावेश झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शनिवारी सकाळी 9 वाजता पहिला तर रात्री 9 वाजता दुसरा एपिसोड दाखविला जाईल, अशी माहिती दिली. त्यामुळे 1986 ते 1988 या दोन वर्षांत दर रविवारी रामायण बघणाऱ्या पिढीत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या दोन वर्षांत अनेक पिढ्यांनी "रामायण'चा आनंद लुटला. यातील एक पिढी कदाचित नसेलही; परंतु त्यावेळी लहान असलेले आता किमान चाळिशीच्या वर पोहोचले असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. एकेकाळी "रामायण'मुळे सकाळी 9 ते 10 या वेळेत रस्त्यांवर संचारबंदीचे चित्र दिसत होते. आता संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर येऊ नये म्हणून "रामायण' दाखविण्याची वेळ सरकारवर आली असल्याची टिप्पणीही काही नागरिक करीत आहेत. मात्र, जुनी पिढी आजच्या पिढीला ज्या रामायणाचे दाखले देत आहे, त्या नव्या पिढीला प्रत्यक्ष मालिकेतून राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण, कैकयी, मंथरा ही पात्रे बघायला मिळणार आहते. 

31 वर्षे आठ महिन्यांनी पुनःप्रसारण

15 जानेवारी 1986 ला रामायण मालिकेचा पहिला एपिसोड दाखविण्यात आला तर 31 जुलै 1988 ला शेवटचा एपिसोड दाखविण्यात आला होता. तब्बल 31 वर्षे सात महिने व 28 दिवसांनी रामायण मालिका शनिवारपासून सुरू झाली आहे.

महाभारत, शक्तिमानही सुरू करण्याची मागणी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर मालिका सुरू करण्याची माहिती दिली. देशभरातील नागरिकांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करीत "महाभारत' व "शक्तिमान' ही मालिका सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे या मालिकाही पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT