Ramdas Athawale on BJP will change constitution opposition allegation marathi politics news
Ramdas Athawale on BJP will change constitution opposition allegation marathi politics news  
नागपूर

Ramdas Athawale News : संविधान बदलण्याची भाषा करणारेच बदलतील; रामदास आठवलेंचं विरोधकांवर टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : संविधान बदलणार असल्याचा चुकीचा समज कॉंग्रेसकडून पसरविण्यात येत आहे. या विषयावर ते दिशाभूल करीत आहे. संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. संविधान बदलण्याची भाषा करणारे बदलतील, संविधान बदलणार नाही, अशा शब्दात आरपीआयाचे (आठवले गट) नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

जुने कायदे बदलणे म्हणजे संविधान बदलणे नव्हे असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही आठवले यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

संविधानाबाबत कॉंग्रेसकडून दिशाभूल सुरू आहे. त्यांच्या भूलथापांना आंबेडकरी जनतेने बळी पडण्याचे कारण नाही. मोदी हे एक सक्षम नेतृत्व आहे. गेल्या दहा वर्षात अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतली. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. ती तीन नंबरवर आणायची आहे. जनता दल, अटल बिहारी वाजपेयी, व्ही.पी. सिंह यांच्याकाळात नेतृत्व सक्षम होते. त्यामुळे त्याकाळात सरकार बदलले झाला. आता विरोधकांकडे नेतृत्‍व नाही. त्यामुळे बदल होणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी भूपेश थूलकर, माजी आमदार मिलिंद माने, धर्मपाल मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.

आघाडीकडून आंबेडकरांचा अपमान

महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्रही लिहिले होते. परंतु, त्यांना अपेक्षेप्रमाणे जागा न सोडता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा अपमान केला. आपण एनडीएत असल्याने त्यांना इकडे येता आले नाही, असे ते म्हणाले.

केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद

राज्यात एक ते दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी होते. परंतु, एकही जागा मिळाली नाही. मात्र, बदल करणे योग्य नाही, मोदींसोबत राहिलो पाहिजे, असा देशभरातील कार्यकर्त्यांचा मानस होता. त्यामुळे आम्ही एनडीएसोबत आहो. केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदासाठी वरिष्ठांशी बोलण्याचा शब्द फडणवीस यांनी चर्चेदरम्यान दिल्याचेही त्यांनी सांगितिले. राज ठाकरे यांचा निर्णय योग्य असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT