Shyamkumar Barve sakal
नागपूर

Ramtek Lok Sabha Election Result : रामटेकच्या गडावर महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांनी तिरंगा फडकावला

शिवसेना आणि भाजपला रामटेकमध्ये बसला मोठा धक्का.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झालेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात रामटेकच्या गडावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी तिरंगा फडकावला. यामुळे शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे.

रामटेकमध्ये शिवसेनेचा उमेदवार आमच्या बळावर निवडून येतो हा भाजपचा भ्रमसुद्धा आता दूर झाला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. खासदार कृपाल तुमाने हे सलग दोन वेळा येथून निवडून आले होते. शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर ते शिंदे सेनेत दाखल झाले.

दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर शिवसेनेचा खासदार रामटेकमधून निवडून येतो असा दावा भाजपच्यावतीने केला जात होता. यावेळी हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र शिंदे जुमानले नाहीत. मात्र उमेदवार बदलला. ही चूक महायुतीला भोवली.

दुसरीकडे काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांची उमेदवारी निश्चित केली होती. माजी मंत्री सुनील केदार यांनी ही निवडणूक खाद्यांवर घेतली होती. रश्‍मी बर्वे यांचे जातप्रमाणत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये येथून लढण्यास इच्छुक होते.

मात्र केदारांनी त्यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशान फडकावले. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे येथे अतिशय चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा वर्तविली जात होती. मात्र मतदारांनी आयात केलेल्या पारवे यांना नाकारले. केदारांचे समर्थक बर्वे यांना डोक्यावर घेतले.

श्‍यामकुमार बर्वे - ६, १३,०२५

राजु पारवे - ५,३६,२५७

मताधिक्य - ७६ हजार ७६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT