Raju Parve sakal
नागपूर

Ramtek Loksabha Election Result : पारवेंचा कुणी केला गेम?

रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांना आघाडी मिळवून दिली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - तीन आमदार तसेच प्रदेशाध्यक्ष असतानाही माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजप तसेच महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला. रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांना आघाडी मिळवून दिली.

कामठी हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ते सलग तीन वेळा निवडूण आले होते. राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्रीसुद्धा ते होते. सध्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते विधान परिषदेचे आमदार आहे. कामठी येथे भाजपचे टेकचंद सावरकर आमदार आहेत. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या विजयाची गॅरंटी बावनकुळे यांनी घेतली होती. किंबहुना त्यांना भाजपचा उमेदवार करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला.

याच मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही झाली होती. हे बघता पारवे यांना सर्वाधिक मताधिक्य कामठी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात महायुतीचे राजू पारवे कामठीत १७ हजार ५३४ मतांनी पिछाडीवर राहिले. याच कामठीने मागील निवडणुकीत तुमाने यांना २४ हजार ४६४ मतांची आघाडी दिली होती.

हिंगणा मतदारसंघ सुमारे दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. आमदार समीर मेघे यांनी येथे चांगलाच जम बसवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण केले. असे असतानाही पारवे हिंगण्यातून १७ हजार ८६२ मतांनी मागे आहेत. रामटेकमध्ये शिंदे सेनेचे आशिष जयस्वाल आमदार आहेत. यापूर्वीसुद्धा ते तीनवेळा आमदार होते. शिंदे सेनेचा उमेदवार म्हणून पारवे यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून मोठी आशा होती. ती फोल ठरली. ४ हजार ६६८ मतांनी ते येथे माघारले आहे.

राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. येथून तरी ते आघाडीवर राहतील अशी अपेक्षा होती. मात्र ते स्वतःलाही आपल्याच मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देऊ शकले नाहीत. तब्बल १४ हजार ८७९ मतांनी ते येथे पिछाडीवर आहेत. सावनेर हा सुनील केदारांचा बालेकिल्ला असून येथून त्यांना मताधिक्य मिळण्याची शक्यताच नव्हती. येथून आघाडीचे बर्वे यांना १६ हजार ६०९ मतांची आघाडी आहे. अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातूनही पारवे यांना ५ हजार १०८ मतांचा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT