Ramtek Lok Sabha Election esakal
नागपूर

Ramtek Lok Sabha Election: रामटेकमध्ये काँग्रेस, सेनेला विजयाची समान संधी; रश्मी बर्वे अपात्र ठरल्याने पेच

Ramtek Lok Sabha Election: अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेला विजयाची समान संधी आहे. रश्मी बर्वेंचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे पती मविआचे उमेदवार ठरू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

Ramtek Lok Sabha Election: रामटेक लोकसभा मतदारसंघाने नागपूर शहराला वेढले आहे. भौगोलिक क्षेत्र प्रचंड मोठे असलेल्या या मतदारसंघातील सावनेर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंदेगटात सहभागी झाले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेला विजयाची समान संधी आहे. रश्मी बर्वेंचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे पती मविआचे उमेदवार ठरू शकतात.

२०१९चे चित्र

कृपाल तुमाने (शिवसेना) विजयी मते : ५९७१२६

किशोर गजभिये (काँग्रेस) मते : ४७०३४३

सुभाष गजभिये (बसप) मते : ४४३२७

किरण पाटणकर (वंचित आघाडी) मते : ३६३४०

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १२६७८३

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : काँग्रेस

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

‘मविआ’चा उमेदवार अद्याप निश्चित नाही

शिंदे सेनेने दावा केला असला तरी भाजपला हा मतदारसंघ हवा

भाजप आणि शिवसेनेचा हिंदू दलित उमेदवार देण्यावर भर

काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांची भूमिका महत्त्वाची

हे प्रभावी मुद्दे...

सर्व विकास नागपूरला शहराला लागून असलेल्या भागांमध्येच

रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात युवकांचे स्थलांतर

एमआयडीसीमध्ये स्थानिकांना फारसा रोजगार नाही

नगर परिषद, पंचायत समित्यांची सुमारे दोन वर्षांपासून निवडणूक नसल्याने स्थानिकांमध्ये रोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT