Ranjit Safelkar remanded in police custody till April 7 Nagpur crime news 
नागपूर

रणजित सफेलकरची पोलिसांनी काढली धिंड; अनवाणी पायाने, बरमुड्यावरच नेले न्यायालयात

अनिल कांबळे

नागपूर : कुख्यात गुंड मनीष श्रीवासच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार गॅंगस्टर रणजित सफेलकरला अनवाणी पायाने, बरमुड्यावरच पोलिसांनी न्यायालयात हजर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्‍यांनी ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या धाडसाचे शहरभर कौतुक होत आहे. सफेलकरच्या अटकेने निमगडे हत्याकांडातील अनेक मोठे मासे गळाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०१२ मध्ये महिलेशी मौजमजा करण्याचे आमिष दाखवून मास्टरमाईंड आरोपी रणजित सफेलकर, शरद ऊर्फ कालू हाटे, भरत हाटे आणि त्यांच्या साथीदारांनी मनीषचे अपहरण केले. पवनगाव (धारगाव) येथील एका घरात आरोपींना मनीषचा गळा चिरून खून केला. त्याचा मृतदेह कामठी येथे आणून त्याच्या शरीराचे तुकडे केले. चारचाकी वाहनाने मनीषच्या मृतदेहाचे तुकडे करई घाटात नेऊन फेकले.

याप्रकरणी पोलिसांनी शरद आणि भरत हाटे यांना अटक केली. दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. त्याचप्रमाणे ज्या घाटात मृतदेहाचे तुकडे फेकले ते ठिकाण सुद्धा आरोपींनी दाखविले. ज्या सेंट्रो कारमधून मनीषच्या मृतदेहाचे तुकडे नेण्यात आले ती कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली असून फरार रंजित सफेलकरलाही पोलिसांद्वारे अटक करण्यात आली. पोलिसांना चकमा देऊन सफेलकर भंडाऱ्याकडे गेला होता. त्याची बॅग प्रवासात हरवली. त्यात आढळलेल्या पॅनकार्ड, एटीएम आदींद्वारे त्याचा तपास करण्यात आला. 

बुधवारी सफेलकरला नागपूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी महेश जोशी यांच्यासमक्ष हजर केले. तसेच प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सफेलकरला ११ दिवसांसाठी पोलिस रिमांडवर द्यावे, अशी विनंती केली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्‍यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेत सफेलकरला ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

सफेलकर हा एकनाथ निमगडे हत्याकांडाचाही मास्टरमाईंड आहे. त्याला श्रीवास हत्याकांडाचा तपास झाल्यानंतर सीबीआयच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय संदीपान पवार यांच्या पथकाने केली.

गर्वाचे घर खाली

स्वतः गॅंगस्टर असल्याचे भासवत रणजित सफेलकर हा खंडणी, भूखंड हडपणे, धमकी देणे आणि वसुली करण्याचे काम करीत होता. त्याची गुन्हेगारीत चांगलीच दहशत होती. काही बड्या राजकीय व्यक्तींचाही त्याच्या डोक्यावर हात होता. त्यामुळे तो गुन्हेगारीत सक्रिय राहत होता. आलिशान कारमध्ये फिरणाऱ्या रणजितला आज गुन्हे शाखा पोलिसांनी अनवाणी आणि बरमुड्यावर न्यायालयात हजर केल्याने त्याचे गर्वहरण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT