Leopard Cat  Sakal
नागपूर

Leopard Cat : मध्यभारतात प्रथमच दुर्मीळ प्रजातीच्या ‘लेपर्ड कॅट’चे दर्शन; पेंच प्रकल्पात झाली नव्‍या वन्य प्राण्याची नोंद

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर (लेपर्ड कॅट) नरहर गावाजवळ आढळली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर (लेपर्ड कॅट) नरहर गावाजवळ आढळली. मध्यभारतामध्ये बिबट्या मांजर दिसण्याची ही पाहिलीच वेळ आहे. नरहर जवळील एका पाणवठ्यावर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला होता. त्यामध्ये तिचे छायाचित्र कैद झाले आहे.

मांजर कुळातील एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. भारतात असलेल्या एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी १० लहान प्रजाती आहेत. या लहान प्रजाती मुख्यत: उंदरांच्या शिकारीमुळे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिका बजावतात. सध्यास्थितीत ही प्रजाती दुर्मीळ झालेली आहे.

मध्यभारतात प्रथमच दुर्मीळ प्रजातीच्या ‘लेपर्ड कॅट’चे दर्शन

बिबट्या मांजर (Prionailurus bengalensis) जी भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे. ती ईशान्य भारत, उत्तर हिमालयीन राज्ये, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि पश्चिम घाटाच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात सापडते. परंतु मध्य भारतात बिबट्या मांजरीचे अस्तित्व नाही.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंग देव वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या बफर वनपरिक्षेत्र ‘नागलवाडी’ च्या नरहर बीटमधील कक्ष क्रमांक ६६३ मध्ये ती आढळली आहे. हे मध्य भारतीय लँडस्केपमधील सर्वात प्राचीन संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर ‘नरहर’ गावापासून फक्त दोन किमी अंतरावर आहे.

चार प्रकल्पांचा कॉरिडॉर

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आग्नेयेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उत्तरेला पेंच व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) आणि ईशान्येला कान्हा व्याघ्र प्रकल्पासह (मध्य प्रदेश) कॉरिडॉर जोडलेले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात सात वनपरिक्षेत्र आहेत. त्यापैकी दोन बफर वनपरिक्षेत्र आणि पाच कोअर वनपरिक्षेत्र आहेत.

लेपर्ड कॅटच्या अस्तित्वामुळे आतापर्यंत तुलनेने कमी-अभ्यास केलेल्या मांजर कुळातील बिबट्या मांजराच्या सविस्तर अभ्यास करण्यावर भर राहणार आहे. याशिवाय त्याचे संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यासाठी मार्ग मोकळे होणार आहेत. भारतातील त्याच्या सविस्तर वर्गीकरण करण्याची अधिक चांगली संधी मिळेल. पेंच प्रकल्पात बिबट मांजर आढळल्याने त्याचा मागोवा घेऊन सवंर्धनावर अधिक भर द्यावा लागणार आहे.

डॉ. प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT