Ration shopkeepers in Nagpur are getting threats 
नागपूर

पेहचानता नही क्‍या, साहब का आदमी हू, ...नाही तर घ्यावा लागणार हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे लोकांना रोजगार मिळणे कठीण झाले. गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. घरात अठराविश्‍व दारिद्रय असल्याने जवळ पैसे नाही. अशात लॉकडाउन सुरू झाल्याने जागयचे कसे, असा प्रश्‍न आवासून उभा आहे. सर्वात जास्त प्रभाव गरीब व मजुरी करणाऱ्यांवर झाला आहे. त्यामुळे त्यांना धान्य पुरविण्याचे सरकारने ठरवले आहे. यासाठी रेशन दुकानदारांना परवानगी दिली आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही रेशन दुकानदार सेवा देत असताना त्यांना धमक्‍या व शिवीगाळीचा सामना करावा लागत आहे. 

गरिबांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. कमी पैशामध्ये धान्य पुरवित आहे. यामुळे प्रत्येक रेशन दुकानासमोर नागरिकांच्या रांगा लागत आहे. आपल्याला लवकरात लवकर धान्य मिळावे यासाठी त्यांची घाई सुरू आहे. मात्र, गरिबांच्या धान्यावर दुसऱ्यांचा डोळा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. "पेहचानता नही क्‍या, साहब का आदमी हू, चल एक बोरा घर भेज दे', "भाऊ नी पाठवल आहे लवकर धान्य पाठव' अशा प्रकारच्या धमक्‍या देत धान्याची मागणी रेशन दुकानदारांना केली जात आहे.

रेशन दुकानदारांना थकाकथित पुढारी, गल्लीबोळातील गुंड यांच्याकडून त्रास दिला असल्याच्या तक्रारी आहेत. काही नेते समाजकार्याचा देखावा करण्यासाठी धान्य देण्याची जबरस्ती दुकानदारांना करीत आहेत. विरोध केल्यास खोट्या तक्रारी केल्या जात आहे. एका दुकानदाराने नगरसेवक धान्यासाठी धमक्‍या देत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

ओम गणेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारे संचालित रेशनदुकानदाराने एका नगरसेवकाने शिवीगाळ करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दीक्षा महिला बचत गटातर्फे संचालित रेशन दुकान तसेच सदर येथील प्रकाश किराणा भंडारच्या दुकानदाराने गर्दी करू नका असे सांगितल्यावर उपस्थितांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली आहे. 

राजकीय पुढाऱ्यांच्या दादागिरीचाही सामना

कोरोनाच्या संकटकाळात गोरगरिबांना धान्य पुवरवठ्याची जबाबादारी असलेल्या रेशन दुकनदारांना काही राजकीय पुढाऱ्यांच्या दादागिरीचाही सामना करावा लागत आहे. धमक्‍या आणि शिवीगाळ करण्याऱ्यांपासून संरक्षण द्यावे, अन्यथा एक मेपासून रेशन दुकाने बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संरक्षण द्या

आमच्या विरोधाताली अपप्रचारामुळे रेशन दुकानदार घाबरले आहेत. नियमित व नियामानुसार धान्याचा पुरवठा केला जात असताना कोणीही तक्रार करतो आणि कुठलीही खातरजमा न करता प्रशासनातर्फे थेट कारवाई केली जाते. त्यामुळे धान्य कसे वाटप करायचे असा प्रश्‍न आहे. दुकानांमध्ये गर्दी करू नका असे प्रशासनाचे निर्देश आहेत. मात्र, कोणीच ऐकत नाही. अशा परिस्थिती सरंक्षण प्रदान करावे, अन्यथा आम्हाला नाईलाजाने दुकाने बंद ठेवावी लागतील, असा इशारा रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT