Ravi Rana Ravi Rana
नागपूर

Ravi Rana : नागपूर विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकत्यांची घोषणाबाजी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा सतत शिवसेनेविरोधात बोलत असतात. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आमदार रवी राणा यांच्याविरोधात नागपूर विमानतळावर घोषणाबाजी केली. रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अमरावती महापालिका आयुक्तावर झालेल्या शाहीफेक प्रकरणानंतर आमदार रवी राणा गायब झाले होते. कारवाईच्या भीतीने पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकाव व मुख्यमंत्री आपल्याला फसवण्याचा मागे लागल्याचे रवी राणा म्हणाले होते.

कोणत्याची प्रकारची चौकशी न करता सरकार आपल्याला फसवण्याच्या मागे लागल्याचे ते म्हणाले होते. यामुळे शिवसैनिक आक्रामक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार रवी राणा (Ravi Rana) हे पोलिसांना घाबरून दिल्ली येथे गेल्याची चर्चा निरर्थक आहे. ते मतदारसंघातील कामासाठी दिल्लीला ठाण मांडून आहेत. योग्य वेळ येताच ते हजर होतील, असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

शाहीफेक प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावातच आमदार रवी राणा (Ravi Rana) तसेच कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहे. मनपा आयुक्तांच्या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. या प्रकाराची संसदीय समिती, केंद्रीय अनुसूचित जाती आयोग तसेच मागासवर्गीय आयोगाकडे रितसर तक्रार करणार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT