नागपूर

मास्कशिवाय नवरीला घ्यायला जाणे पडले महागात; नवरदेवाला दंड

राजेश प्रायकर

नागपूर : नवरीला घ्यायला जाण्यासाठी घोडा, कपाळावर बाशिंग, डोळ्यावर काळ्या गॉगलसह दिमाखात जात असलेल्या नवरदेवाला मास्क न घालणे चांगलेच महागात पडले. मास्क न घालणाऱ्यांच्या शोधात असलेल्या महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नवरदेवावर पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. नवरदेवच मास्कशिवाय (mask) आघाडीवर असल्याने सोबत असलेल्या वऱ्हाड्यांवरही नजर गेली. यातील चौघांकडून प्रति व्यक्ती पाचशे रुपये वसूल करण्यात आले. (Recovery-of-fine-from-groom-who-does-not-wear-mask)

कोरोनामुळे प्रत्येकानेच मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दररोज दंड ठोठावण्यात येत आहे. तरीही अनेकजण मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वऱ्हाडासह नवरीला घ्यायला जात असलेल्या नवरदेवानेही कॅमेऱ्यात चेहरा पूर्ण येण्यासाठी मास्क घातला नसेल तर आश्चर्य वाटायला नको. अशाच एका नवरदेवाला मास्क न घालणे चांगलेच महागात पडले.

नेहरूनगर झोनअंतर्गत नंदनवन येथील मंगल कार्यालयात घोड्यावर बसून जात असताना नवरदेव मास्कशिवाय दिसून आला. मास्क नाही तर दंड, एवढेच ठाऊक असलेल्या मनपाच्या उपद्रव शोधपथकाने थेट नवरदेवाचा घोडाच रोखला. ते बघून वऱ्हाडी मंडळीतही खळबळ माजली. ज्यांच्याकडे मास्क होते, त्यांनी तत्काळ नाकापर्यंत वर सरकवले.

परंतु, लग्नसमारंभात जाताना मास्क वापरणे तर सोडाच, जवळ बाळगणेही ‘शान के खिलाफ’ समजणाऱ्यांनाही उपद्रव शोध धक्का दिला. नवरदेवासह पाच जणांना उपद्रव शोध पथकाने दंड ठोठावला. याशिवाय सतरंजीपुरा झोनअंतर्गत एका लग्नासमारंभासाठी मंडप उभारणाऱ्यांवरही एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

आतापर्यंत पावणे दोन कोटींचा दंड वसूल

शहरात मास्क न घालणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. आज उपद्रव शोध पथकाने तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला. मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा दंड पथकाने वसूल केला.

(Recovery-of-fine-from-groom-who-does-not-wear-mask)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT