Reduction in salary of employees from private colleges 
नागपूर

सरकारने आदेश दिल्यानंतरही खासगी महाविद्यालयांनी उचलले हे पाऊल, शिक्षकांना होतोय त्रास...

मंगेश गोमासे

नागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बऱ्याच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार कपात करून देण्यात येत असल्याची तक्रार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) करण्यात आली आहे. या तक्रारीवरून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीप्रमाणेच पगार देण्याची सूचना अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली आहे. 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणाखाली देशभरातील आर्किटेक्‍चर, अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, फार्मसी, हॉटेल, अप्लाईड आर्ट ऍण्ड क्राफ्ट या अभ्यासक्रमांची जवळपास 10 हजार 897 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात जवळपास 32 लाख 84 हजार 417 विद्यार्थी शिकतात. शिवाय 5 लाख 62 हजार 625 प्राध्यापक आणि जवळपास इतकेच शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. 

कोरोनामुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही खासगी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे पगार कापू नका, असे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहे. मात्र, बऱ्याच महाविद्यालयांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारात कपात केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बऱ्याच कर्मचारी आणि प्राध्यापकांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे तक्रार केल्याचे समजते. 

स्वायत्त संस्थांना ताकीद

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात जी महाविद्यालये किंवा विद्यापीठे स्वायत्त आहेत, त्या विद्यापीठांनी वा महाविद्यालयांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली आहे. खासगी महाविद्यालयांना ताकीद वजा सूचना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी वा तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचे वेतन थकवू नका अशा सूचनाही एआयसीटीईने केली आहेत. 

पगार न थांबविण्याची सूचना 
देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता अशा महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापक वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न थांबविण्याची सूचना केलेली आहे. या सूचनेनुसार महाविद्यालयांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. 
- प्रो. अनिल सहस्रबुद्धे, 
अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT